मुंबई

उतेखोल केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात

CD

राजिप शाळा उतेखोल येथे उतेखोल केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात
माणगाव (बातमीदार) ः माणगाव पंचायत समितीअंतर्गत उतेखोल केंद्राची केंद्रस्तरीय शिक्षण परिषद बुधवार (ता. २३) रायगड जिल्हा परिषद शाळा, उतेखोल येथे पार पडली. केंद्रप्रमुख शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिषद झाली.
विकास कॉलनी शाळेच्या मुख्याध्यापिका पूर्वा येलवे यांनी इयत्ता पहिलीचा बदललेला अभ्यासक्रम आणि नावीन्यपूर्ण उपक्रम या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. बामणोली शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका वैशाली पवार यांनी गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा यासंदर्भात प्रत्यक्ष माहितीपुस्तिकेसह सविस्तर मार्गदर्शन केले. उतेखोलवाडी शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका स्नेहल उतेकर यांनी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती, मंथन, आरटीएस स्पर्धा परीक्षा या विषयांवर उदाहरणासह अभ्यासपूर्ण माहिती दिली आणि मार्गदर्शन केले. उतेखोल केंद्राचे प्रमुख शंकर शिंदे यांनी नवभारत साक्षरता, शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षा, पायाभूत परीक्षा, विद्यार्थी सुरक्षा, निपुण भारत अभियान, विद्यार्थी अध्ययन स्तर निश्चिती, आपत्कालीन परिस्थितीत व्यवस्थापन, स्कॉपसंदर्भात माहिती, घरघर संविधान, शालेय भौतिक सुविधा, गणवेश, पाठ्यपुस्तक, विद्यार्थी प्रमोशन, आदिवासी विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे इत्यादी प्रशासकीय विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: ४० वर्षांची सोबत संपली! नांदणी गावातील महादेवी हत्तीच्या नेण्यामागची संपूर्ण कहाणी; अखेर भावनेपेक्षा पैसा मोठा ठरला!

Pune : मुलाचा खेळताना मित्रांशी वाद, नेत्याच्या पुतण्याचा राडा; अल्पवयीनाच्या पोटात घातली लाथ, VIDEO VIRAL होताच अटक

Latest Maharashtra News Updates : पोलिसांना विचारणे आहे की रेव्ह पार्टी म्हणजे काय?

Stock Market Opening: सलग चौथ्या दिवशी शेअर बाजार घसरला; गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले

IND vs ENG 5th Test: इंग्लंडच्या संघात 'तो' परतला; टीम इंडियाला पाचव्या कसोटीत 'वेगवान' माऱ्याने हैराण करणार

SCROLL FOR NEXT