मुंबई

कशेडीतील जुना महामार्ग दुर्लक्षित

CD

पोलादपूर, ता. ३१ (बातमीदार)ः मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात जुन्या महामार्गावर भोगाव गावच्या हद्दीतील रस्ता अतिवृष्टीमुळे खचला आहे. दरवर्षी हा प्रकार होत असल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थ आक्रमक झाले असून, गणपतीपूर्वी रस्त्याची दुरुस्ती झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
जुन्या महामार्गावरील कशेडी घाट परिसरात २६ गावांचा समावेश असून, सध्या बोगदा मार्गे वाहतूक सुरू आहे, मात्र कशेडी घाटातील जुना महामार्गाकडे दुर्लक्ष होत आहे. हा रस्ता सुमारे ९० ते १०५ फूट लांब आणि चार फुटांपेक्षा जास्त खोल खचला असून, सर्वत्र तडे गेले आहेत. रस्ता पुन्हा खचल्यास या मार्गावरील एसटीसेवा बंद होण्याची शक्यता आहे. तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार अशा सर्व नेते मंडळींनी रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिले आहे, मात्र दुरुस्तीच्या नावाखाली तात्पुरती मलमपट्टी केली जात आहे. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी रस्ता दुरुस्ती झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष सुहास मोरे यांनी दिला आहे.
----------------------------------
लाखोंचा निधी खर्च
२००५ च्या अतिवृष्टीमध्ये कशेडी घाटातील भोगाव हद्दीत महामार्ग ९० ते १२५ फूट लांब रस्ता दरडी कोसळून खचला होता. या मार्गावर मलमपट्टीसाठी शासनाचा लाखोंचा निधी वाया गेला आहे, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : 'या' मुहूर्तावर होणार ठाकरे बंधुंच्या युतीची घोषणा, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं...

BIG BREAKING: मोहसिन नक्वी अखेर आले गुडघ्यावर! ट्रॉफी न देण्यावरून BCCI ची मागितली माफी

Latest Marathi News Live Update: दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सोने बाजाराला झळाळी

RCB Ownership: आरसीबीची टीम महाराष्ट्रातील उद्योगपती खरेदी करण्याच्या तयारीत; किती कोटींना होणार डील?

Jayant Patil Vs Padalkar : गोपीचंद पडळकरांनी देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेला दाखवली केराची टोपली, जयंत पाटलांना जहरी भाषेत पुन्हा दिलं आव्हान

SCROLL FOR NEXT