मुंबई

फ्लेमिंगोच्या आश्रयस्थळांना सुरक्षाकवच

CD

तुर्भे, ता. २ (बातमीदार) : नवी मुंबई पालिकेच्या विकास आराखड्यातील सुधारणांनुसार डीपीएस फ्लेमिंगो तलाव, एनआरआय आणि टीएस चाणक्य पाणथळ जागा म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे फ्लेमिंगोंच्या आश्रयस्थळांच्या संरक्षणासाठी पर्यावरणप्रेमींच्या लढ्याला यश आले असून अंतिम शिक्कामोर्तबासाठीची मोहीम सुरू झाली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या पूर्वीच्या मसुद्यात तीन पायऱ्या निळ्या रंगात पाणथळ जागा म्हणून चिन्हांकित केल्या आहेत; परंतु सिडकोने भविष्यातील विकासासाठी डीपीएस तलाव आणि प्रस्तावित गोल्फ कोर्ससाठी एनआरआय पाणथळ जागा म्हणून चिन्हांकित केले आहे. सिडकोने टीएस चाणक्य पाणथळ जागा निवासी क्षेत्र म्हणून दर्शवले आहे. राज्य नगरविकास विभागाने जारी केलेल्या प्रस्तावित सुधारणांवरील अधिसूचनेनुसार, याबाबत २३ ऑगस्टपर्यंत सूचना आणि हरकती मागवल्यात आहेत. त्यानंतर याबाबतच्या निर्णयाला अंतिम मंजुरी मिळणार आहे.
-----------------------------
पालिका, सिडकोत मतभेद
महापालिकेने पाणथळ जागा, फ्लेमिंगो निवासस्थाने आणि इको-टुरिझम स्थळे म्हणून राखण्याचा प्रस्ताव दिला होता; परंतु सिडकोने प्रस्तावाला प्रतिसाद दिलेला नाही. डीपीनुसार, एनआरआय पाणथळ जागेला लागून असलेल्या सेक्टर ६० येथील सुरू असलेला रिअल इस्टेट विकास, मसुदा डीपीमधील सुधारणांनुसार निवासी क्षेत्र म्हणून कायम ठेवले आहे; पण नोव्हेंबर २०१८ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने निवासी- कम- व्यावसायिक प्रकल्प आणि गोल्फ कोर्स रद्द केला होता; परंतु सिडकोने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने या प्रकरणाची सुनावणी प्रलंबित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: आनंदाची बातमी! मुंबई लोकलच्या 'या' मार्गावर १० अतिरिक्त ट्रेन चालवणार, २ नवीन स्थानके सुरू होणार

Viral Video: प्राजक्ता माळीचे योगासने पाहिले का? सोशल मीडियावर व्हिडिओ केला पोस्ट, नेटकरी म्हणाले...

Astrology Prediction : कितीही प्रयत्न करा 'या' राशीच्या लोकांचं लग्न टिकत नाही! आयुष्यभर राहतो तणाव..पाहा 'या' जोड्या कोणत्या?

Latest Marathi Breaking News Live: बच्चू कडूच्या विखे पाटलांवरील वक्तव्यानंतर भाजप आमदार प्रवीण तायडे आक्रमक

Ozar Municipal Election : ओझरची निवडणूक फिरणार कदम काका-पुतण्याभोवती! आमदार बनकरांची भूमिका निर्णायक; इच्छुकांची भाऊगर्दी, अपक्षही वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT