मुंबई

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचा जनतादरबार

CD

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचा जनसंवाद
माजी आमदार पंडित पाटील जनता दरबार घेणार
रोहा, ता. ५ (बातमीदार)ः नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी माजी आमदार पंडित पाटील भारतीय जनता पक्षाच्या वतीने रोहा तालुक्यातील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बालेकिल्ल्यातच जनता दरबार होणार असल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
रोहा तालुक्यातील नागरिकांच्या समस्या, तक्रारी तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवताना येणाऱ्या अडचणी, पायाभूत सुविधा, रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण अशा विविध प्रश्नांवर गुरुवारी (ता. ७) सकाळी साडेदहा वाजता शासकीय विश्रामगृहात हा जनता दरबार होणार आहे. तालुक्यातील चणेरा, नागोठणे, कोलाड, सुतारवाडी, तिसे, भालगाव, धाटाव, वरसे, वाशी, तळाघर, विरजोली, उडदवणे, चिल्हे, खांब, आतोणे, संभे, खारगाव, यशवंतखार, मेढा, रोठ बुद्रुक, रोठ खुर्द अशा प्रत्येक विभागातील लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन रोहा तालुका भाजप अध्यक्ष अमित घाग यांनी केले आहे.
-------------------------------
समस्यांवर तत्काळ तोडगा
जनता दरबारात प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही आमंत्रित करण्यात येणार असल्याने काही समस्यांवर तत्काळ तोडगा निघण्याची शक्यता आहे. रोहा तालुक्यातील सर्व नागरिक, शेतकरी, उद्योजकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: टीकाकारांना खणखणीत उत्तर! शुभमन गिल होणार एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार? रोहित शर्मा किती काळ खेळेल?

Latest Marathi News Updates : सहकार बोर्ड अध्यक्षपदी संजय मंडलिक, उपाध्यक्षपदी अमित देसाई यांची बिनविरोध निवड

Mahadevi Kolhapur Return : महादेवीची घरवापसी लांबणार, कायदेशीर प्रक्रियेने कोल्हापुरकरांच्या चळवळीला यश येणार का?

Ganesh Festival Pune 2025 : विसर्जन मिरवणुकीबाबत समन्वयाने तोडगा काढू, पुणे पोलिस आयुक्तालयात बैठक; मानाच्या मंडळांकडून निर्णय जाहीर

Besan Tomato Paratha: सकाळच्या नाश्त्यात 20 मिनिटांत बनवा रुचकर बेसन टोमॅटो पराठा, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT