मुंबई

दहीहंडी उत्सवात महिला पथकांचाही लक्षणीय सहभाग

CD

दहीहंडी उत्सवात महिला पथकांचाही लक्षणीय सहभाग
जिल्ह्यात साधारण ३० महिला गोविंदा पथके
अलिबाग, ता. ५ (वार्ताहर) : पुरुषांच्‍या बरोबरीने स्त्रिया सर्वच क्षेत्रांत लौकिक मिळवत आहेत. गेल्या काही वर्षांपासून गोविंदा उत्‍सवात दहीहंडीसारख्‍या साहसी क्रीडा प्रकारातदेखील लक्षवेधी सहभाग घेऊ लागल्‍या आहेत. केवळ शहरातीलच नव्‍हे तर ग्रामीण भागातील तरुण गोपिकांची पथकेही यात मागे नाहीत. जिल्ह्यात साधारण ३० महिला गोविंदा पथके आहेत. हळूहळू त्‍यांची संख्‍या वाढते आहे, ही बाब नक्कीच स्‍वागतार्ह म्‍हणावी लागेल.
गेल्या काही वर्षांपासून अनेक क्रीडा प्रकारांत महिलांनी आपला नावलौकिक मिळविला आहे; परंतु गोविंदासारख्‍या साहसी खेळातदेखील पुरुषांच्‍या बरोबरीने महिला पुढे येत आहेत. अलिबागसारख्‍या शहरी भागात महिला गोविंदा पथके मागील काही वर्षांपासून दहीहंडी उत्‍सवात सहभागी होत आहेत. या पथकांना प्रोत्‍साहन देण्‍यासाठी विविध मंडळे पुढे आली असून, महिलांसाठी स्‍वतंत्र स्‍पर्धा सुरू झाल्‍या. पाचनाका गोविंदा महिला पथक गेली १३ वर्षे दहीहंडीमध्ये सहभाग घेत आहे. चार वर्षांपासून ते ४० वर्षांपर्यंतच्या वयोगटातील मुली, महिला यांचा सहभाग असतो. घरत आळीत राहणारे प्रसाद अनंत पाटील हे यांना प्रशिक्षण देतात.
एक महिना आधीपासूनच आम्ही सराव करतो, असे प्रियांका पाटील हिने सांगितले. आक्षी येथे मानाची हंडी फोडण्यासाठी आम्हाला दरवर्षी आमंत्रण असते. तसेच पेझारी त्यानंतर अलिबाग येथील शेतकरी भवन येथे जातो. चार थरापर्यंत आम्ही मानवी मनोरा रचतो. आमचे प्रशिक्षक हे आमच्याकडून चांगला सराव करून घेतात, अशी माहिती प्रियांका पाटील हिने दिली. अनेक बक्षिसेही आम्ही मिळवली आहेत. आदर्श मित्रमंडळाचे सहकार्य नेहमीच असते. उंच थर लावून दहीहंडी फोडण्यात मजा असते. अलिबाग शहरानजीक असलेल्‍या गोंधळपाडा येथील महिला गोविंदा पथक मागील काही वर्षांपासून दहीहंडी उत्‍सवात सहभागी होत असते.

चौकट :
जिल्ह्यातील एकूण महिला पथके : ३०
सहभागी महिला, मुलींचा वयोगट : ४ ते ४० वर्षे

पाठिंबा-प्रोत्साहन मिळते

नोकरदार, गृहिणी, महाविद्यालयीन तरुणी तसेच शाळेत जाणाऱ्या विविध गटांतील महिला, मुलींचा या महिला पथकात समावेश आहे. यासाठी घरातूनही आम्हाला पाठिंबा मिळतो, असेही महिलांनी सांगितले. दिवसभराची काम आटोपून आम्‍ही संध्‍याकाळी सराव करतो. ग्रामस्‍थांचा आम्‍हाला पाठिंबा आणि प्रोत्‍साहन मिळते, असेही पथकातील मुलींनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Whatsapp Resahre : तुमचा स्टेटस कोण रिशेअर करणार हे फक्त तुम्हीच ठरवायचं! व्हॉट्सअ‍ॅपने आणलं गेमचेंजर फीचर, कसं वापरायचं? पाहा

Ajit Pawar: अजित पवार गटाला धक्का! माजी विरोधी पक्षनेते स्वगृही; शरद पवार पक्षात प्रवेश

Chakan Traffic Jam : चाकणला वाहनांच्या चार किलोमीटर रांगा, पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीचे ग्रहण काही सुटेना

Prakash Awade : 'किती दर देणार ते सांगत नाही पण एकरकमी पैसे देणार', प्रकाश आवाडेंचा शब्द; शेतकऱ्यांना AI चे मार्गदर्शन करणार...

Nashik Rain Update: नाशिकमध्ये पावसाचा धुमाकूळ... रस्ते, रेल्वे वाहतूक विस्कळीत, गावांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT