मुंबई

मालाडच्या हनुमान मंदिरातील चोरीचा पर्दाफाश

CD

मालाडच्या हनुमान मंदिरातील चोरीचा पर्दाफाश
गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या दोघांना अटक
अंधेरी, ता. ६ (बातमीदार) ः मालाडच्या हनुमान मंदिरातील चोरीचा पर्दाफाश करण्यात मालाड पोलिसांना यश आले आहे. याप्रकणी घरफोडीचा गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. मोहम्मद रिझवान मजीबुल अन्सारी आणि शोएब इमाम खान अशी या दोघांची नावे आहेत.
दोन्ही आरोपी सध्या पोलिस कोठडीत असून, त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. त्यांनी अशाच प्रकारे इतर काही मंदिरांत चोरी केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यातील तक्रारदार मालाडच्या सुंदरनगर परिसरात राहतात. याच परिसरातील एका हनुमान मंदिरात ते पुजारी म्हणून काम करतात. सकाळी सात ते रात्री साडेनऊ वाजता मंदिर भाविकांसाठी खुले असते.
मंदिराच्या दानपेटीतून महिन्याला अंदाजे सात ते आठ हजार रुपये जमा होतात. २८ जुलैला रात्री साडेनऊ वाजता ते नेहमीप्रमाणे मंदिर बंद करून घरी गेले होते. या वेळी त्यांनी मंदिरातील कपाटात सहा हजारांची रोकड ठेवली होती. दुसऱ्या दिवशी ते नेहमीप्रमाणे मंदिरात आले. त्यावेळी त्यांना मंदिरातील कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यामुळे त्यांनी मंदिरात प्रवेश करून पाहणी केली असता, अज्ञात चोरट्याने मंदिरात प्रवेश करून चोरी केल्याचे दिसून आले.
कपाटातील सहा हजारांची रोकड तसेच दानपेटीतील रोकड चोरट्याने चोरी केली होती. अंदाजे १३ हजार रुपयांची रोकड पळविण्यात आली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी मालाड पोलिसांना ही माहिती दिली. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला. मंदिरात झालेल्या चोरीच्या घटनेने स्थानिक भाविकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती. त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशांनतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपीची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू केला होता. या फुटेजसह तांत्रिक माहितीवरून पोलिसांनी मोहम्मद रिझवान आणि शोएब खान या दोघांनाही संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनीच ही चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election Results: ''नितीश कुमार मुख्यमंत्री होते आणि पुढेही राहतील'' जेडीयूची पोस्ट, पण नंतर...

IND vs SA, 1st Test: पहिल्याच दिवशी २०० च्या आत द. आफ्रिका ऑलआऊट; जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्स, तर सिराज, कुलदीपही चमकले

Bihar Election Result 2025 Live Updates : बिहार निवडणुकीत एनडीएने २०० चा आकडा ओलांडला, निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

Delhi Red Fort Blast: लाल किल्ल्याजवळ स्फोट : २,९०० किलो स्फोटके कुठून आली? काँग्रेसचा मोदी सरकारला सवाल

Motorola Discount : मोटोरोलाचा ब्रँड 5G मोबाईल चक्क 3 हजारात; कुठं सुरुय ही 50% डिस्काउंट ऑफर? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT