मुंबई

रायगडमध्ये जनधन खात्यांची तपासणी

CD

रायगडमध्ये जनधन खात्यांची तपासणी
१ जुलै ते ३० सप्टेंबरदरम्यान गावागावांत जनजागृती मोहीम
अलिबाग, ता. ६ (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यातील जनधन योजनेतील खातेधारक, तसेच सामाजिक सुरक्षा योजनांच्या लाभार्थ्यांसाठी १ जुलैपासून ‘री-केवायसी’ आणि नव्या नोंदणीसाठी व्यापक अभियान सुरू करण्यात आले आहे. भारत सरकारच्या वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांनुसार हे अभियान ३० सप्टेंबरपर्यंत चालणार असून, जिल्हा प्रशासन, विविध बँका आणि ग्रामपंचायतींच्या माध्यमातून गावागावांत शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत.
या अभियानाचा शुभारंभ रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या उपस्थितीत रविवारी करण्यात आला. या वेळी जिल्हा अग्रणी प्रबंधक विजय कुलकर्णी यांनी सर्व नागरिकांना शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यामध्ये ‘जनधन खात्यांचे’ री-केवायसी, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना यांसारख्या योजनांची नोंदणी केली जात आहे. अनेक जनधन खाती आता दहा वर्षांचा कालावधी पूर्ण करत असल्याने री-केवायसी प्रक्रिया अनिवार्य झाली आहे. त्यामुळे लाभाची सातत्यपूर्ण अंमलबजावणी होण्यासाठी ही प्रक्रिया गरजेची आहे. बँका आता ग्रामपंचायतींमध्ये जाऊन थेट सेवा देत आहेत.
...................
विशेष मेळाव्याचे आयोजन
याच अभियानांतर्गत शुक्रवार (ता. ८) रोजी बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ रजनीश कर्नाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत सेंट्रल स्कूल, आमटेम येथे एक विशेष मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या वेळी पाबळ खोरेतील कोंढवा, वरप, जिर्णे येथील आदिवासी नागरिकांना योजनांमध्ये सहभागी करून घेण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे दुर्गम भागातील नागरिकांना बँकिंग सेवा आणि सामाजिक सुरक्षेचे कवच सहज मिळू शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. नागोठणे, आमटेम, पाबळ खोरे आणि पेण तालुक्यातील नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलकर्णी यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: ध्रुव जुरेलचे पहिले कसोटी शतक! रवींद्र जडेजासह मिळून वेस्ट इंडिजचा 'गेम' केला, रिषभची वाढवली धडधड

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवा अन् ४० लाखांचा फंड मिळवा, 'ही' स्कीम माहिती आहे का?

लगाच्या १२ वर्षानंतर घेतला घटस्फोट; आता मुलाचा एकट्याने सांभाळ करतेय मराठी अभिनेत्री; , म्हणते- त्याला माझी गरज...

Crime: वृद्ध महिलेचं ३५ वर्षीय मजुरासोबत प्रेमाचं सूत जुळलं; एकत्र राहण्यासाठी भयंकर कृत्य केलं, जे घडलं त्यानं कुटुंब हादरलं

"मुंज्या सिनेमा मराठीत बनणार होता पण.." दिग्दर्शकाचा धक्कादायक खुलासा ; म्हणाला...

SCROLL FOR NEXT