मुंबई

''एक धागा सैनिकांसाठी'' भगिनी समाज शाळेचा उपक्रम

CD

‘एक धागा सैनिकांसाठी’ भगिनी समाज शाळेचा उपक्रम
पालघर, ता. ६ (बातमीदार) ः शहरातील भगिनी समाज संस्था संचालित, प्राथमिक विद्यामंदिर भगिनी समाज शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘एक धागा सैनिकांसाठी’ हा उपक्रम राबविला आहे. शिक्षक दर्शन भंडारे व दिलीप देसक व मुख्याध्यापिका प्रीती वर्तक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
देशाच्या विविध सीमावर्ती भागात अहोरात्र देशसेवा करणारे सैनिक रक्षाबंधन सणाच्या दिवशीसुद्धा आपले कर्तव्य बजावत असतात. त्यांचे मनोबल वाढावे, या भावनेतून भगिनी समाज शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध आकाराच्या आणि रंगांच्या जवळपास २०० राख्या बनविल्या आणि सैनिकांसाठी शुभेच्छापत्रेही लिहिली. सोमवारी (ता. ४) पालघर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात राख्या सुपूर्द करताना उपस्थित पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये, भाजप नेते नंदकुमार पाटील, कृषी व पशुसंवर्धन माजी सभापती संदीप पावडे, भाजपचे सरचिटणीस समीर पाटील यांनी विद्यार्थी प्रतिनिधी स्वराली बहिर व अंतरा देशमुख यांच्याकडून राखी बांधून घेतली आणि त्यांना ओवाळणी देऊन त्यांचे अभिनंदन केले. पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या राख्या व शुभेच्छापत्रे टपालाद्वारे लेह, लडाख येथील सैनिकांच्या विविध बटालियन असलेल्या मुख्यालयी पत्त्यावर पाठवले. प्राथमिक विद्यामंदिर भगिनी समाज शाळेने राबविलेल्या उपक्रमाचे पालकवर्गातून कौतुक होत आहे.


फोटो ः पालघर भगिनी समाज विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी सैनिकांसाठी राख्या पाठवल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Education News : त्रिभाषा धोरणावर नाशिकमध्ये मतभेद; हिंदी सक्तीऐवजी तिसरी भाषा ऐच्छिक, तोंडी असावी!

Ichalkaranji Shocking Raid : बाई हा काय धक्कादायक प्रकार! इचलकरंजीत रेकॉर्डवरील बाई विकत होती गांजा; पोलिसांच्या छाप्यात उघड झालं भयानक दृश्य

Latest Marathi Breaking News : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच नाशिक मध्ये कुंभमेळ्यातील काही कामांना नागरिकांचा विरोध

Zudio vs Zara : स्पर्धा वाढताच झाराचे कपडे झाले स्वस्त? झुडिओपेक्षा काय बेस्ट..कुठे मिळतोय जास्त डिस्काउंट, सर्वकाही पाहा एका क्लिकवर

Rahu Gochar 2025: यंदा 2 डिसेंबरपासून 'या' राशींच्या लोकांना मिळेल प्रचंड संपत्ती अन् सन्मान

SCROLL FOR NEXT