मुंबई

पनवेल महापालिकेच्यावतीने सार्वजनिक गणेशोत्सव नियोजन बैठक, विविध विषयांवरती चर्चा

CD

गणेशोत्सवासाठी महापालिकेची तयारी
नियोजन बैठकीत विविध विषयांवरती चर्चाः मंडळांना सूचना
पनवेल, ता. ६ (बातमीदार) ः सार्वजनिक गणेशोत्सवाचे नियोजन करण्याच्या हेतूने आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली आद्य क्रांतिवीर वासुदेव बळंवत फडके नाट्यगृहात मंगळवारी (ता. ५) बैठक घेण्यात आली. या वेळी पनवेल महापालिकेच्या वतीने गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना ऑनलाइन पद्धतीने परवाना सुविधेची माहिती प्रात्यक्षिकासह देण्यात आली. यासोबतच पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा यावषियीही माहिती देण्यात आली.
या वेळी मंगेश चितळे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त रविकिरण घोडके, उपायुक्त स्वरूप खारगे, शहर अभियंता संजय कटेकर, महापालिका कार्यक्षेत्रातील सहा पोलिस स्थानकांचे पोलिस निरीक्षक आणि महापालिका अधिकारी, सिडको, विद्युत वितरण, गणेश मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मंगेश चितळे म्हणाले, की सहा फुटांच्या आतील गणेशमूर्ती कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित कराव्या. वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी रायगड सुरक्षा मंडळाकडून जादा रक्षक घेणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. याबरोबरच निर्माल्य रथामध्ये गणेश मंडळांनी आपले निर्माल्य टाकण्याच्या सूचना आयुक्तांनी उपस्थित गणेश मंडळांना दिल्या. अपघातमुक्त, आनंदाने सण साजरा करण्याच्या दृष्टीने महापालिका तत्पर असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते म्हणाले, की गणेश मंडळांनी गणेशमूर्तीची काळजी घेण्याच्या दृष्टीने स्वयंसेवक २४ तास मंडपामध्ये ठेवावे आणि सीसीटीव्ही लावावे. गणेश मंडळांनी आपल्या साउंड सिस्टीमचा आवाज मर्यादित ठेवण्याविषयीचे आवाहन या वेळी त्यांनी केले. नियमांचे काटेकोर पालन करून गणेश मंडळांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

स्पर्धांचे आयोजन
स्वरूप खारगे यांनी पर्यावरणपूरक गणोशोत्सवासाठी तयार केलेल्या सप्तसूत्री व पर्यावरणपूरक गणेश उत्सव स्पर्धेची माहिती दिली. सार्वजनिक गणेश मंडळे व घरगुती सजावट स्पर्धा, मूर्तीदान व कृत्रिम तलावामध्ये बाप्पाचे विसर्जन या महापालिकेच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी होण्याविषयी आवाहन केले.

परवानगीसाठी एक खिडकी योजना
उपायुक्त रविकिरण घोडके यांनी शासनाच्या १५० दिवस कार्यक्रमांतर्गत गणेशोत्सव मंडळांना ऑनलाइन पद्धतीने एक खिडकी योजना अमलात आणली असल्याचे सांगून यासाठी तयार केलेल्या ऑनलाइन प्रणालीची माहिती दिली. या प्रणालीनुसार वाहतूक पोलिस, पोलिस स्टेशन, अग्निशमन विभाग, मालमत्ता विभाग यांचे ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून प्रभाग समिती अ, ब, क, ड उपविभाग नावडे यांच्यामार्फत मंडप परवानगी देण्यात येणार आहे. या सर्व बाबी एकाच ठिकाणी होणार असल्याचे सांगितले. यासाठी महापालिकेने https://pandal.maharts.com/ वेबसाईट तयार केली आहे. गणेश मंडळांनी या वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करावेत, असे आवाहन या वेळी त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticized USA : भारतावर 'टॅरिफ बॉम्ब' फोडणाऱ्या अमेरिकेला आता चीननेही सुनावलं!

Gold Village: सोन्याचा पाऊस पडणारं गाव! महाराष्ट्रातील 'या सोनेरी गावाची' कहाणी तुम्ही ऐकलीये का?

Male News : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! शनिवारपासून अंधारबन, कुंडलिका व्‍हॅली पर्यटकांसाठी खुली, ऑनलाईन बुकिंग बंधनकारक

Vice President Election Update: मोठी बातमी! उपराष्ट्रपती पदाबाबतचा निर्णय, पंतप्रधान मोदी अन् जे.पी.नड्डा घेणार; 'NDA' बैठकीत ठराव

Latest Maharashtra News Updates: वडील रागावल्यामुळे मुलाने केली आत्महत्या, पुण्यातील घटना

SCROLL FOR NEXT