मुंबई

पोलीस हवालदाराच्या खात्यावर डल्ला

CD

पोलिस हवालदाराच्या खात्यावर डल्ला
अंधेरी, ता. ९ (बातमीदार) ः बँकेचे अ‍ॅप हॅक करून एका पोलिस हवालदाराच्या बँक खात्यातून ऑनलाइन व्यवहार करून ७४ हजार ४०० रुपयांवर डल्ला मारणाऱ्या दोन सायबर ठगांना बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. अरुण मनोज राणा आणि भोला मेघलाल राणा अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनाही बोरिवलीतील स्‍थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोन्ही आरोपी पोलिस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
समाधान रतन जाधव हे वसईत राहत असून सध्या बोरिवली पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. १२ जुलै २०२५ रोजी ते दिवसपाळीवर कर्तव्यावर हजर झाले होते. सकाळी पावणेनऊ वाजता ते बोरिवलीतील भाजी मार्केट, अंजता मॉलजवळ असताना त्यांच्या मोबाईलवर बँकेचे दोन मेसेज आले होते. या मॅसेजच्या पाहणी केल्यानंतर त्यांना त्यांच्या बँक खात्यातून ५० हजार आणि २६ हजार ४०० रुपये डेबिट झाल्याचे दिसून आले. त्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती, ओटीपी तसेच पासवर्ड कोणालाही शेअर केले नव्हते. या व्यवहारातून खात्यातून ७६ हजार ४०० रुपये डेबिट झाले होते. त्यांनी त्यांच्या बँकेचे अ‍ॅप ओपन करण्याचा प्रयत्न केला; मात्र ते अ‍ॅप ओपन झाले नव्हते. त्यांचा मोबाईल हॅक झाल्याचे दिसून आले. त्यांनी बँकेत जाऊन ही माहिती सांगितली. अज्ञात व्यक्तीने त्यांचा मोबाईल हॅक करून ही फसवणूक केल्याने त्यांनी सायबर हेल्पलाइनसह बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची वरिष्ठ पोलिस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी गंभीर दाखल गुन्हे आणि सायबर सेल पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. तांत्रिक माहितीवरून पोलिसांनी अरुण राणा आणि भोला राणा या दोघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच समाधान जाधव यांच्या बँकेचे अ‍ॅप हॅक करून ही फसवणूक केल्याचे उघडकीस आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: यश ढाका खून प्रकरणात तिघे अटकेत; कुटूंबियांनी घेतली एसपींची भेट

Viral Video: महिलेच्या पर्समधून १० हजार पळवले अन् छतावर जाऊन बसले माकड; पैसे परत मिळण्यासाठी उपयोगी आली अनोखी आयडिया, पाहा व्हिडिओ

Dhule News : भर वर्दळीच्या रस्त्यावर निष्पाप बँक अधिकाऱ्याचा एसटीखाली चिरडून मृत्यू; देवपूरमध्ये संतापाची लाट

Thane News: महिन्याभराने लग्न पण घरात शोककळा! चिमुरडीनंतर कुटुंबातल्या आणखी एकाचा मृत्यू; सर्पदंशाची घटना

Makeup Without Damaging Skin: त्वचा खराब न करता मेकअप कसा कराल? स्मिता शेवाळे सांगते मेकअपच्या आधी आणि नंतर घ्यायची काळजी

SCROLL FOR NEXT