मुंबई

सुतारवाडी नाक्यावर भटक्या श्वानांचा उच्छाद

CD

सुतारवाडी नाक्यावर भटक्या श्वानांचा उच्छाद
पादचाऱ्यांना वाढता धोका; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
रोहा, ता. १० (वार्ताहर) ः रोहा-विले-भागाडमार्गे पुणे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील सुतारवाडी नाका परिसर आणि त्यालगतची ढोकळेवाडी व कुडली नाका भागात सध्या भटक्या श्वानांनी उच्छाद मांडला आहे, शिवाय दिवसाढवळ्या रस्त्याच्या मध्यभागी उभ्या राहणाऱ्या श्वानांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. त्यातील काहींची त्वचा गंभीर जखमी झालेली असून, पिसाळल्यासारख्या अवस्थेत ते लोकांवर धावत जातात, भुंकतात आणि दंश करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे.
परिसरातून दररोज शालेय विद्यार्थी, पादचारी तसेच मोठ्या संख्येने वाहनचालक प्रवास करतात. विद्यार्थ्यांना या श्वानांचा त्रास विशेषतः जाणवतो. अचानक धावून येणाऱ्या श्वानांमुळे दुचाकीस्वारांना तोल जाऊन अपघात होण्याचा धोका वाढला आहे. काही वेळा अतिवेगाने जाणारी वाहने श्वानांना धडक देऊन पुढे निघून जातात. अपघातात मृत झालेले श्वान रस्त्याच्या कडेला पडून राहतात, ज्यामुळे कुजल्याचा तीव्र दुर्गंध परिसरात पसरतो. या दुर्गंधीमुळे पादचारी आणि स्थानिक रहिवाशांना आरोग्यविषयक त्रास सहन करावा लागतो.
नागरिकांच्या म्‍हणण्यानुसार मोकाट गुरांप्रमाणेच भटक्या श्वानांमुळेही वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. लहान मुले, वृद्ध आणि महिलांना या श्वानांपासून जास्त धोका असून, कधीही चावा घेण्याचा प्रकार घडू शकतो. वाहनचालकांनाही सतत सावधगिरी बाळगत या भागातून मार्ग काढावा लागतो.
स्थानिकांनी नगरपालिका व पशु संवर्धन विभागाला वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी तातडीने भटक्या श्वानांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पकड मोहिमा राबवून त्यांचे लसीकरण व निर्बंधन करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar : मुस्लिम धर्मगुरुंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना, निषेधार्थ आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

Suryakumar Yadav Net Worth : सूर्यकुमार यादवची संपत्ती किती? पगार सोडून 'या' मार्गाने होते कमाई

Video: एकनाथ शिंदेंची कॉपी करणं आलं अंगलट; शिवसेनेच्या महिला प्रवक्त्याची जिल्हाधिकाऱ्यांनी केली फजिती

Heart Health Tips for Young Adults: हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी तरुणांना व्यायाम अन् संतुलित आहारावर भर देण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

SC Reservation : 'अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करू नका, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार'; आनंदराज आंबेडकरांचा सरकारला थेट इशारा

SCROLL FOR NEXT