मुंबई

माहेरघरात गणेशमूर्ती बनविण्याची लगबग

CD

माहेरघरात गणेशमूर्ती बनविण्याची लगबग
यंदा पीओपीच्या डायमंड कपड्यातील मूर्तींना विशेष मागणी
पेण, ता. १० (वार्ताहर) ः गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेण शहरात आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्ती बनविण्याची लगबग शिगेला पोहोचली आहे. येथील तसेच हमरापूर, जोहे, तांबडशेत, कळवा आदी भागांतील मोठ्या कारखान्यांमध्ये हजारो कारागीर दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. राज्यभरातील गणेशभक्तांना आकर्षित करणाऱ्या या मूर्तींपैकी यंदा पीओपीच्या (प्लास्टर ऑफ पॅरिस) डायमंड कपड्यातील गणेशमूर्तींना सर्वाधिक पसंती मिळत आहे.
गेल्या काही वर्षांत पर्यावरणीय कारणांमुळे पीओपीच्या मूर्तींवर निर्बंध आले होते, मात्र सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच ही बंदी उठवल्यानंतर, राज्यभरातील कारखान्यांमध्ये पुन्हा पीओपीच्या मूर्ती तयार करण्याची धावपळ सुरू झाली आहे. यामुळे कारागिरांमध्ये नवचैतन्य आले असून, विशेषतः पेणमधील कारखान्यांमध्ये डायमंड कपड्यातील मूर्तींच्या ऑर्डर्सचा ओघ वाढला आहे.
२७ ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाचा प्रारंभ होत असल्याने, कारखान्यांमध्ये मूर्तींवर रंगरंगोटी, दागदागिने सजावट आणि अंतिम टप्प्यातील कामे जोमाने सुरू आहेत. दीपक कला केंद्र, पेण येथे वाढत्या मागणीला प्रतिसाद देत डायमंड कपड्यातील मूर्तींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई गणपती, फेटेवाला गणपती यांसारख्या लोकप्रिय स्वरूपांच्या मूर्तींबरोबरच विविध आकारातील आणि थीमवरील मूर्तीदेखील मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत.
...............
व्यापाराची चक्रे वेगाने
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून, पेणसाठी तो आर्थिक चैतन्याचाही उत्सव आहे. मूर्ती बनविण्याच्या उद्योगामुळे स्थानिक कारागिरांना रोजगार मिळतो, तसेच शहरात व्यापाराची चक्रे वेगाने फिरतात. यंदा न्यायालयाने पीओपीवरील बंदी उठवल्याने, पारंपरिक मातीच्या मूर्तींबरोबरच हलक्या वजनाच्या व आकर्षक पीओपीच्या मूर्तींना नव्याने संधी मिळाली आहे. दररोज हजारो ग्राहक कारखान्यांना भेट देत असून, काही ठिकाणी तर विक्रीसाठी उभ्या असलेल्या मूर्तींचा साठा संपत आला आहे. कारागिरांसाठी हा काळ सर्वाधिक गडबडीचा असून, कामाच्या तासांचे बंधन नाही, दिवसरात्र मूर्तींची घडण सुरूच आहे, असे दीपक कला केंदाचे संचालक सचिन समेळ यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळणार! कधी अन् कुठे, IMDने तारीखच सांगितली

Zomato delivery boy accident: झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मुसळधार पावसात पडला उघड्या गटारात अन् मग...

मुंबई-वडोदरा एक्सप्रेसवेचे काम अंतिम टप्प्यात, प्रवासात पाच तासांची बचत; कधीपासून होणार वाहतूक सुरु?

Mhada House: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाचे घर होणार आणखी स्वस्त, किती टक्क्यांनी घटणार; वाचा अहवाल

PM Modi and Zelenskyy : मोठी बातमी! आता मोदी अन् झेलेन्स्कींचीही झाली चर्चा; जाणून घ्या, कोण काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT