मुंबई

रक्षाबंधन दिनी एसटीला लाडक्या बहिणींकडून भेट

CD

रक्षाबंधनदिनी एसटीला लाडक्या बहिणींकडून भेट
दोन दिवसांत तीन कोटी ४५ लाखांचे विक्रमी उत्पन्न
ठाणे, ता. ११ (बातमीदार) : रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींनी एसटीला आर्थिक लाभ देत त्याच्या आर्थिक विकासाला मोठा हातभार लावला आहे. ठाणे विभागाने केवळ दोन दिवसांत तीन कोटी ४५ लाखांचे विक्रमी उत्पन्न मिळवले असून, हे उत्पन्न मुंबई प्रदेशातील सर्वाधिक आहे. तथापि, गायमुख घाटाजवळील रस्त्याच्या कामामुळे झालेल्या वाहतूक कोंडीचा फटका एसटीला बसला आहे. घोडबंदर व भिवंडी मार्गावरील मोठ्या कोंडीमुळे एसटीला या दोन दिवसांत अंदाजे १५ लाखांचा आर्थिक फटका सहन करावा लागला.

रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधण्यासाठी बाहेर जाणाऱ्या बहिणींनी एसटीचा मोठा वापर केला. ८ आणि ९ ऑगस्टच्या दोन दिवसांत महिलांनी त्यांच्या कुटुंबांसह एसटीने प्रवास करीत जादा वाहतुकीतून तीन कोटी ४५ लाख इतके उत्पन्न मिळवून दिले. ठाणे विभागाने या सणासाठी अतिरिक्त बस गाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या, ज्याचा महिलांनी पुरेपूर वापर करून सुरक्षित प्रवास केला. हे उत्पन्न गतवर्षीच्या तुलनेत ३३ लाखांनी जास्त आहे. या वाढीव उत्पन्नामुळे एसटीला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.

वाहतूक कोंडीचा फटका
रक्षाबंधनाच्या दिवशी घोडबंदर रोड आणि भिवंडी मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने एसटीच्या बसेस वेळेत पोहोचू शकल्या नाहीत. यामुळे एसटीचे उत्पन्न १० ते १५ लाखांनी कमी झाले, असे अधिकाऱ्यांचे मत आहे.

ठाणे विभागातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने रक्षाबंधनासाठी पूर्वनियोजित जादा बस गाड्यांची सेवा सुरू ठेवली होती. या प्रवाशांच्या वाढत्या संख्येचा यशस्वीपणे सामना करण्यात आला. विभागीय नियंत्रक सागर पळसुले यांनी सर्व चालक, वाहक, वाहतूक नियंत्रक, यांत्रिकी कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी, पर्यवेक्षक, आगार व्यवस्थापक आणि इतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
- सागर पळसुले, विभाग नियंत्रक, ठाणे विभाग

आकडेवारी

एकूण किमी : ५,४५,०००
एकूण उत्पन्न : तीन कोटी ४५ लाख
गतवर्षीपेक्षा उत्पन्नात वाढ : ३३ लाख
गतवर्षीपेक्षा जादा प्रवास : ४१,४८५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google 27th Birthday: तब्बल 27 वर्षांचा प्रवास! इंटरनेटच्या बादशहानं 'असा' केला वाढदिवस साजरा, 'डूडल'मधून दिलं खास सरप्राईज

राज्यातील 'या' महिलांना भाऊबीजेला मिळणार २ हजार... लाडक्या बहिणींचं काय?

Tata Capital: वर्षातील सर्वात मोठा IPO येणार; दिवाळीपूर्वी टाटा कॅपिटलचे शेअर्स खरेदी करण्याची सुवर्णसंधी

Navratri 2025 Day 6: नवरात्रीच्या सहाव्या दिवशी माता कात्यायनीची पूजा कशी करावी? जाणून घ्या विधी, मंत्र आणि महत्त्व

World Tourism Day 2025: प्रवासाची सुरुवात मैत्रीपासून! चला, पुन्हा जग फिरुया… आणि जुन्या आठवणी ताज्या करूया, पर्यटन दिनानिमित्त तुमच्या खास मित्रांना मराठीतून पाठवा शुभेच्छा!

SCROLL FOR NEXT