मुरूड-जंजिरा नगर परिषदेचा डिजिटल टप्पा
व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवेला सुरुवात
मुरूड, ता. १२ (बातमीदार) ः मुरूड-जंजिरा नगर परिषद नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि सुलभ प्रशासनासाठी ओळखली जाते. या ध्येयाकडे आणखी एक पाऊल टाकत नगर परिषदेने ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’ ही आधुनिक डिजिटल सेवा सुरू केली आहे. घरबसल्या अनेक सेवा उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमामुळे नागरिकांच्या वेळेची आणि श्रमांची मोठी बचत होणार आहे.
या उपक्रमाचे लोकार्पण मुरूड-अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते नगर परिषदेच्या प्रशासकीय कार्यालयात झाले. या चॅटबॉटच्या माध्यमातून नागरिकांना तक्रार नोंदणी, विविध दाखले मिळवणे, ना हरकत प्रमाणपत्र यांसारख्या सेवांचा लाभ जलदगतीने मिळेल. सेवा पूर्णपणे डिजिटल स्वरूपात दिली जाणार असल्याने प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढणार आहे.
हा उपक्रम नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार आंबेतकर आणि कर निर्धारण अधिकारी अनिकेत जगदाळे यांच्या प्रयत्नातून राबविण्यात आला आहे. या चॅटबॉटची निर्मिती क्रिशिव इंटरप्राइजेसचे अजय थोरात आणि निकिता थोरात यांनी केली आहे. QR क्यूआर कोड स्कॅन केल्यावर नागरिक थेट नगर परिषदेच्या व्हॉट्सॲप चॅटबॉटशी जोडले जातील आणि आवश्यक सेवांचा लाभ घेऊ शकतील.
या तंत्रज्ञानामुळे नागरिकांना केवळ अर्ज व तक्रारीच नोंदविता येणार नाहीत, तर त्यांची स्थिती तपासणे, आवश्यक कागदपत्रे सादर करणे आणि प्रमाणपत्रे डाऊनलोड करणेही शक्य होईल. यामुळे कार्यालयीन फेऱ्यांची गरज मोठ्या प्रमाणावर कमी होईल.
.............
सुविधेचा वापर करण्याचे आवाहन
डिजिटल माध्यमातून पारदर्शक आणि जलद सेवा देण्याचा आमचा प्रयत्न नागरिकांच्या सहकार्याने अधिक यशस्वी होईल. मुरूड-जंजिरा नगर परिषद प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी या सुविधेचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.