मुंबई

वसई-विरारकरांची प्रवासकोंडी!

CD

वसई, ता. १२ (बातमीदार) : सणासुदीच्या महिन्यात वेतनाला विलंब झाल्याने वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (ता. १२) पहाटेपासून कोणतीही पूर्वसूचना न देता काम बंद आंदोलनाला सुरुवात केली. परिणामी रस्त्यावर एकही बस न धावल्याने शहरातील परिवहन सेवेवर अवलंबून असलेल्या हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. विद्यार्थ्यांसह कामगारवर्गाचे चांगलेच हाल झाल्याने त्यांची तारांबळ उडाली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर दोन दिवसांत वेतन देण्याचा सकारात्मक तोडगा निघाला आणि दुपारी दोन वाजता रस्त्यावर पुन्हा बस धावल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

परिवहन सेवेतील वाहक, चालकांना दरमहिन्याच्या सात तारखेला वेतन मिळते, परंतु या महिन्यात १२ तारीख आली तरी मागील महिन्यातील पगार मिळत नसल्याने आज पहाटेपासून अचानक बंद पुकारण्यात आला. याबाबत एसएनएन ठेकेदार, महापालिका व प्रवाशांना कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे महापालिकेचे उपायुक्त प्रशांत जाधव, सहाय्यक आयुक्त विश्वनाथ तळेकर हे सातिवली येथील बस डेपोत पोहोचले होते. ठेकेदार विनोद वासू, त्यांचे सहकारी तसेच कमर्चारी यांच्यात समस्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. या वेळी वेतनाबाबत असलेल्या अडचणी मांडण्यात आल्या. वाहक व चालकांनी अनेक समस्यांचे गाऱ्हाणे प्रशासनासमोर ठेवले, परंतु पूर्वसूचना न देता अत्यावश्यक सेवा बंद करण्यावरून प्रशासनाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आणि तोडगा काढण्यात आला. त्यानंतर दुपारी बससेवा पूर्ववत सुरू करण्याचे आश्वासन कर्मचाऱ्यांनी पालिका व ठेकेदाराला दिले. त्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास बस पुन्हा रस्त्यावर धावायला लागल्या.

एकीकडे महापालिका सुविधा देत असली, तरी बस बंद करून प्रवाशांना वेठीस का धरते, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला. आम्हाला वेतन वेळेवर मिळावे. सणासुदीच्या काळात खरेदी व कुटुंबाला लागणारे साहित्य खरेदीसाठी पैसे नाहीत. याकडे लक्ष दिले नसल्याने बस बंद ठेवल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हणणे मांडले.

प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण
पालिकेच्या बस रस्त्यावर न आल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसून आले. प्रवाशांनी काही जणांनी बस थांब्यांवर तासभर गाडीची वाट पाहिली. अखेर कंटाळून निर्धारित ठिकाणी पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. अनेकांनी खासगी वाहनांतून कार्यालय गाठले, तर काही जणांनी कामावर न जात दांडी मारली.

खासगी प्रवासी वाहनांपेक्षा कमी दरातील महापालिकेच्या परिवहन सेवेचा लाभ मिळतो. त्यामुळे बसने प्रवास करतो. मंगळवारी अचानक बससेवा बंद करण्यात आली. त्यामुळे कामावर खासगी वाहनाने जावे लागलेे.
- वनिता जाधव, महिला प्रवासी

महापालिकेच्या बस सकाळपासून रस्त्यावर धावत नव्हत्या. त्यामुळे नेमके काय घडले, हे समजले नाही. बस बंद असल्याने रोज एकत्र कामावर जाणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी वसई स्थानक ते वसई फाटा रिक्षाने प्रवास केला. त्यामुळे अधिक पैसे मोजावे लागले.
- विपुल परमार, प्रवासी

गेले दोन महिने वेतन वेळेवर मिळत नाही तसेच विश्रांतीगृहाचीही सोय नाही. ड्युटीदेखील अधिक तासांची असते. यासह अन्य समस्या असल्यामुळे सहमतीने बस बंद ठेवण्यात आल्या. पालिका व ठेकेदारांनी आश्वासन दिल्यावर बस सुरू केल्या.
- भीमराव कासारे, कर्मचारी, परिवहन विभाग

कोणतीही पूर्वसूचना न देता परिवहन बस बंद करणे योग्य नाही. सातिवली बस डेपोत जाऊन ठेकेदार व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यावर दुपारी बस सुरू करण्यात आल्या. वेतन व अन्य समस्यांबाबत आयुक्तांकडे म्हणणे मांडले जाईल.
- प्रशांत जाधव, उपायुक्त, परिवहन विभाग

प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला वेतन दिले जाते, मात्र या महिन्यात उशीर झाल्यामुळे वाहक व चालकांनी अचानक बससेवा बंद ठेवली. रक्षाबंधन काळात त्यांना काही पैसे आगाऊ देण्यात आले होते. काही तांत्रिक अडचणीमुळे विलंब झाला होता, मात्र यावर तोडगा काढण्यात आला आहे.
- एस. शेरेकर, व्यवस्थापक परिवहन

विद्यार्थी संख्या - ४,५००
एकूण बसेस - ११४
एकूण प्रवासीसंख्या - ५५ हजार
कर्मचारी - ४६५
चालक - वाहक ३२६
----------
वेतन - महिन्याच्या ७ तारखेला
१२ तारीख उलटूनही वेतन नाही
पालिका व ठेकेदाराने १४ ऑगस्टची तारीख दिली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : शासनाच्या तीन महामंडळाच्या कर्ज योजनेतील अटी शिथिल

Yavtmal School incident: धक्कादायक! तिसरीतील मुलीवर शाळेतील टॉयलेटमध्ये वर्गातील मुलाकडूनच अत्याचार

AUS vs SA, Video: बॉल स्टम्पला लागून लाईट्सही लागले, तरी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज नॉटआऊट; नेमकं काय घडलं की सर्वच झाले अवाक्

'Sanju Samson राजस्थान रॉयल्समधून बाहेर पडण्याचं प्रमुख कारण रियान पराग', माजी क्रिकेटरनं सर्व गणित स्पष्ट सांगितलं

Meat Ban Controversy : स्वातंत्र्यदिनी मांसाहारावर बंदी घालणं अयोग्य...अजित पवार स्पष्टच बोलले... महापालिकांकडून निर्णय मागे घेतला जाणार?

SCROLL FOR NEXT