मुंबई

गणरायाकडून आपत्तींचे हरण

CD

गणरायाकडून आपत्तींचे हरण
रायगड जिल्ह्यात गणेशोत्सवाची धामधूम, बाजारपेठेत उत्साह
आदित्य कडु : सकाळ वृत्तसेवा
पोयनाड, ता. १२ : पावसाळ्यातील अतिवृष्टी, दरड, पूर यांचे पडसाद दरवर्षी गणपती उत्सवावर पडत असतात. यंदा, मात्र अशा घटना फारच कमी घडल्या असल्याने रायगड जिल्ह्यात उत्साही वातावरण आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी बाजारपेठा सजू लागल्या आहेत.
रायगड जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सध्या खरेदीची लगबग सुरू आहे. व्यापाऱ्यांनी ग्राहकांना आवडणाऱ्या शोभेच्या वस्तू, सजावटीचे साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीला आणल्या आहेत. खोपोली, पोयनाड, रेवदंडा, नागोठणे, महाड, इंदापूर प्रमुख बाजारपेठा आहेत. या बाजारपेठा गणपतीच्या साहित्यांनी भरून गेल्या आहेत. अलिबाग तालुक्यातील पोयनाड बाजारपेठ समजली जाते. बाजारपेठेत सांबरी, कुर्डुसपासून हाशिवरे पर्यंतचे नागरिक मोठ्या संख्येने पोयनाड बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी करत आहेत. यंदा भारतीय बनावटीचे साहित्य बाजारात दाखल झाले असून, पर्यावरणपूरक सजावटीवर अनेकांचा भर असणार आहे. गणेशोत्सवात हार, फुले यांना मोठी मागणी असल्याने तेदेखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
-----
समाधानकारक पाऊस - यंदा मॉन्सूनपूर्व पावसाने येथील शेतकऱ्यांची थोडीफार धावपळ झाली, परंतु त्यानंतर पावसाचे सातत्य कायम राहिले. अतिवृष्टीने जनजीवन बाधित होण्याचे फारच कमी दिवस होते. शाळा, महाविद्यालये फारसे दिवस बंद ठेवावे लागले नाहीत. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर येऊन अनेक गावांमध्ये पाणी शिरते, पण पाताळगंगा, कुंडलिका आणि अंबा यांसारख्या नद्यांना अनेकदा पातळी ओलांढण्याच्या घटना सात वेळा नोंदवण्यात आल्या.
--------------------
आपत्कालीन घटनांमध्ये घट : जिल्ह्यात डोंगर आणि दुर्गम भागांमध्ये अनेक गावे आहेत. त्यामुळे पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. तळिये आणि इर्शाळवाडी येथील घटनांनी धोक्याची जाणीव करून दिली. जिल्ह्याच्या भौगोलिक सर्वेक्षणानुसार, अनेक गावे आजही दरडीच्या सावटाखाली आहेत ,परंतु पावसाच्या कृपेमुळे ही यंत्रणा वापरण्याची गरजच भासली नाही.
------------------------
समुद्राला येणारी उधाणे ः पावसाळ्यात समुद्राला मोठ्या प्रमाणात उधाणे येतात, ज्यामुळे किनारपट्टी भागातील शेतात आणि गावांत समुद्राचे खारे पाणी शिरते. धेरंड-शहापूर या परिसरात काही प्रमाणात उधाणाचा तडाखा बसला होता. आता हे प्रमाण कमी झाले आहे.
-----
मॉन्सूनमध्ये सर्वाधिक दुर्घटना जिल्ह्यात घडत असतात. लोकजीवनावरही त्याचे पडसाद पडत असतात. पाच वर्षांच्या सरासरीप्रमाणे यंदा मात्र आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्याची स्थिती निर्माण झाली नाही. पाऊसदेखील समाधानकारक आहे.
- सागर पाठक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रायगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Video: पुण्यात मद्यधुंद चालकाचा प्रताप, टायर निघालेली कार भरधाव वेगाने चालवली अन्...'सकाळ'च्या प्रतिनिधीमुळे टळला मोठा अनर्थ

Nilesh Ghaiwal Gang मधील सदस्याकडे तब्बल ४०० काडतुसे, घायवळसोबत केला गोळीबार | Pune News | Sakal News

Nashik Crime : सुसाईड नोटमधून उलगडा! नवविवाहितेवर ‘करणी’ करणाऱ्या भोंदूबाबा सुनील मुंजेला अटक

Kolhapur Crime :सीसीटीव्हीतून उलगडले शेवटचे क्षण; व्हीनस कॉर्नर, मद्यप्राशन आणि त्यानंतरची खरी कहानी अजूनही...

IND vs SA, 2nd ODI: भारतीय संघाने सलग २० वा टॉस हरला! दक्षिण आफ्रिका संघात तेंबा बावुमाचे पुनरागमन; पाहा दोन्ही टीमची Playing XI

SCROLL FOR NEXT