सहकार पॅनेलचे १५ पैकी ११ उमेदवार विजयी
मुंबई बंदर विश्वस्त सहकारी पतपेढीची निवडणूक
शिवडी, ता. १३ (बातमीदार) ः मुंबई बंदरातील मुंबई बंदर विश्वस्त कर्मचारी सहकारी पतपेढी मर्यादित या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक सोमवारी (ता. ११) पार पडली. यामध्ये स्थानीय लोकाधिकार समिती सहकारी पॅनेलचे १५ पैकी ११ उमेदवार, तर अपना पॅनेलचे चार उमेदवार निवडून आले आहेत.
या निवडणुकीमध्ये स्थानीय लोकाधिकार समिती सहकार पॅनेलचा दणदणीत विजय झाला आहे. स्थानीय लोकाधिकार समिती सहकार पॅनेलचे सर्वसाधारण गटात संदीप चेरफळे, अनंत (अप्पा) भोसले, अजित झाजम, राकेश भाटकर, मनीष पाटील, संदीप गावडे, मिलिंद रावराणे, महिला राखीव गटात सुजाता दळवी, इतर मागासवर्गीय गटात प्रशांत वारेकर, अनुसूचित जाती-जमाती गटात राजेश जाधव, भटक्या विमुक्त जाती-जमाती विशेष मागास प्रवर्ग गटात नामदेव सरगर, असे ११ उमेदवार विजयी झाले आहेत, तर अपना पॅनेलचे सर्वसाधारण गटात मोहन देऊळकर, संदीप घागरे, नितीन कळमकर, महिला राखीव गटात योगिनी दुराफे हे चार उमेदवार विजयी झाले आहेत.
सर्व विजयी उमेदवारांचे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस सुधाकर अपराज, सचिव दत्ता खेसे, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर, मुंबई पोर्ट ट्रस्ट एससी, एसटी, अँड वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी गिरीश कांबळे, अपना पॅनेलचे प्रमुख विजय आचरेकर यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.