मुंबई

सणांमुळे फळांच्या मागणीत वाढ

CD

सणांमुळे फळांच्या मागणीत वाढ
सफरचंद, पेरू, सीताफळाचे भाव वधारले

कासा, ता. १४ (बातमीदार) : हिंदू पंचांगातील पवित्र श्रावण महिना व्रत, उपवास आणि सात्विक आहारासाठी ओळखला जातो. या काळात अनेक जण सोमवार, गुरुवार आणि शनिवार उपवास करतात, ज्यामुळे फलाहाराची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. यंदा पावसाळ्यात फळबागांचे नुकसान, साठवणुकीतील अडचणी आणि वाहतूक विस्कळित झाल्याने फळांचा पुरवठा कमी झाल्याने बाजारात फळांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.

डहाणू तालुक्यातील कासा बाजारपेठेत श्रावण महिन्यात फळांची विक्री जोरात सुरू आहे. मुंबई, नाशिक आणि वापी येथील बाजारातून विविध फळे मागवली जात आहेत, तर स्थानिक डहाणू, घोलवड आणि उंबरगाव भागातील नारळाच्या बागांमुळे नारळ मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. याशिवाय शिमला सफरचंद, संत्री, मोसंबी, पेरू, सिताफळ, पेर, आलूबुखारा, केळी यांना विशेष मागणी आहे.

फळविक्रेत्यांच्या मते, गौरी-गणपतीचा सण येऊ घातल्याने पुढील आठवड्यांत विक्रीत आणखी वाढ होणार आहे. स्थानिक फळविक्रेता बाळा हांडवा यांनी सांगितले की, नाशिक, वाशी येथील फळ मार्केटवरून फळे येत असतात तसेच स्थानिक भागातूनही पेरू, चिकू, केळी, नारळ यांचा पुरवठा होतो. सध्या केळी व सफरचंद यांना विशेष मागणी आहे. ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पूजेसाठीही विविध फळे खरेदी करत आहेत. तालुक्यात पेरू, पपई व चिकू मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत, कारण पावसामुळे पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे अनेक फळे बाहेरून आणली जात आहेत. वाहतुकीचा खर्च जास्त असल्याने भावामध्ये चढ-उतार होत आहे.

सध्याचे फळांचे भाव
फळाचे नाव भाव (रुपये)
सफरचंद १४० ते १८० प्रति किलो
पेरू २०० प्रति किलो
संत्री १०० प्रति किलो
केळी ५० प्रति डझन
आलूबुखारा २०० प्रति किलो
नासपती १०० प्रति किलो
डाळिंब २०० प्रति किलो
पपई १०० प्रति नग
ड्रॅगन फळ २०० प्रति नग


गणेशोत्सवासाठी मागणी वाढली
श्रावण महिना असल्याने पपई, सुपारी, केवढा, नारळ आणि पूजा विधीसाठी लागणाऱ्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढली आहे. स्थानिक फळविक्रेते बाळा हांडवा म्हणाले, ‘‘ही फळे बहुतेक वेळा बाहेरून आणावी लागतात, ज्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढतो आणि नुकसानही होते.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange : निजामाचं गॅझेट स्वीकारलं म्हणता मग तुम्ही इंग्रजांच्या परिवारातले आहात का ? मनोज जरांगेंना राग अनावर, जीभ घसरली?

Dussehra 2025: चक्क...या गावात होते रावणाची पूजा? काय आहे नेमकी परंपरा जाणून घेऊयात

Dussehra Melava 2025 Live Update: संपूर्ण कर्जमुक्ती केल्याशिवाय निवडणुकीची तारीख जाहीर करु देणार नाही- जरांगे पाटील

Mangalwedha Farmers : स्वतःचे नुकसान बाजूला ठेवत सरकारलाच 15 रुपये मदतनिधी पाठवला

Latest Marathi News Live Update : भीमाशंकर साखर कारखान्याच्या 26व्या गळीत हंगामाचा शुभारंभ

SCROLL FOR NEXT