मुंबई

पाककला स्पर्धेत रानभाज्यांच्या पावभाजीची बाजी

CD

विरार ता. १४ (बातमीदार) : मिती क्रिएशन आयोजित श्रावण महोत्सव या सुप्रसिद्ध आणि भव्य पाककला स्पर्धेची, यंग स्टार्स ट्रस्ट पुरस्कृत वसईतील प्राथमिक फेरी समाज उन्नती मंडळ, माणिकपूर या सभागृहात स्पर्धकांच्या भरघोस प्रतिसादात पार पडली. या स्पर्धेत वसई-विरार भागासह गोरेगाव, मिरा रोड आणि डोंबिवलीपर्यंतच्या अशा एकूण ८७ स्पर्धकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
माजी महापौर नारायणराव मानकर, मिती क्रिएशनच्या उत्तरा मोने, समन्वयक प्रकाश वनमाळी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सदर प्रसंगी महिलांना मार्गदर्शन करताना माजी महापौर नारायण मानकर यांनी सांगितले की, नागरिकांना भौतिक सुखसोयींबरोबरच साहित्यिक, सांस्कृतिक आणि कलात्मक समाधान असणे हे समृद्ध शहराचे लक्षण मानले जाते. अशा उपक्रमांतूनच पुढे जाऊन आपल्यापैकी काही महिला एखादे स्नॅक सेंटर, कॅटरींग व्यवसाय किंवा उपाहारगृह सुरू करू शकतील. यापूर्वीही वसई-विरारमध्ये माजी आमदार हितेंद्र ठाकूरांच्या नेतृत्वाखाली यंग स्टार्स ट्रस्टच्या माध्यमातून असे उपक्रम आयोजित केले होते.
न्याहरीचा कोणताही पदार्थ हा विषय स्पर्धकांना दिला गेल्याने त्यांनी पोष्टिकतेसोबतच नवसंकल्पना मांडून पदार्थ बनवले होते. त्यामुळे बाहेरील जंकफूडला घरीच कसा पर्याय देता येईल आणि जास्त करून मुलांसाठी हा पर्याय कसा आकर्षक ठरेल व पौष्टिक पदार्थांमुळे त्यांचे स्वास्थ्यही कसे निरोगी राहील, या सर्व गोष्टींचा सगळ्या स्पर्धकांनी विचार केला होता. यामध्ये जिल्ह्यात उगवणाऱ्या रानभाज्या, शेवगाच्या झाडाच्या शेंगा व कोवळा पाला, कंटोळी, बांबू, केळफूल इ. पासून बनविलेली पावभाजी, श्रावणी कटलेट, बर्गर, शिरपोळी मिसळ, काकडीचा ज्यूस, कचोरी, साबूदाण्याची रसमलाई, फ्लॅावरचा हलवा इ. पदार्थ बनविण्यात आले होते.
वसई-विरार विभागातील या प्राथमिक फेरीतून सिया गावकर, निशा मखना, प्राची कोरे, किर्ती मनवानी आणि रुमा बोस या पाच स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली. तसेच २१ ॲागस्ट रोजी दादर येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी त्यांची निवड करण्यात आली. याव्यतिरिक्त इतर पाच स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिके व तीन स्पर्धकांना यंग स्टार्स ट्रस्टतर्फे पारितोषिक देण्यात आले. याचबरोबर सर्व सहभागी स्पर्धकांना यंग स्टार्स ट्रस्ट तर्फे सहभाग प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident : दोन दिवस जेवलो नाही, खूप शोधलं पण... ताम्हिणी घाटातील अपघाताचे दृश्य पाहून मृत तरुणांचे मित्र ढसाढसा रडले

Mangalwedha News : कात्राळचे शहीद जवान बाळासाहेब पांढरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण जागीच ठार; पाचोड पैठण रस्त्यावरील घटना

Delhi Mumbai Express way : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे वर आता हेलिकॉप्टरची सेवा; अपघातातील जखमींना एअरलिफ्ट करता येणार, पर्यटनालाही चालना

Latest Marathi News Update : देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT