कॅबचालकाची दुभाजकाला धडक
अंबरनाथ, ता. १५ (वार्ताहर) ः एका कॅबचालकाचा पहाटेच्या सुमारास दुभाजकाला धडकून भीषण अपघात झाला. कारच्या दोन्ही एअर बॅग उघडल्याने जीवितहानी टळली असली तरी चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. अंबरनाथमध्ये कल्याण-बदलापूर महामार्गावर शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. ही कॅब बदलापूरहून अंबरनाथच्या दिशेने येत होती.