मुंबई

ऑनलाइन कंपन्याविरोधात चालकांचे आंदोलन

CD

ऑनलाइन कंपन्याविरोधात चालकांचे आंदोलन
प्रादेशिक परिवहन कार्यालयाबाहेर प्रतीकात्मक झेंडावंदन
कल्याण, ता. १६ (वार्ताहर) : ऑनलाइन प्रवासी सेवा देणाऱ्या कंपन्याकडून वारेमाप कमिशन उकळत चालकांची मुस्कटदाबी केली जात आहे. याविरोधात भारतीय गिग कामगार मंच आणि ठाकरे गटाच्या वाहतूक सेनेच्या वतीने कल्याण प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर प्रतीकात्मक झेंडावंदन करण्यात आले. आपल्या हक्कासाठी यापुढेदेखील आंदोलन छेडण्याचा इशारा मंचचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी दिला.
मागील काही वर्षांपासून मुंबई शहर आणि उपनगरात ऑनलाइन कंपन्याकडून रिक्षा आणि टॅक्सीद्वारे ऑनलाइन प्रवासी सेवा उपलब्ध करून दिली जात आहे. खासगी रिक्षा-टॅक्सीचालकांकडून प्रवाशाची लूट सुरू असताना ही सेवा तुलनेने स्वस्त असल्याने प्रवाशांकडून या सेवेला प्राधान्य दिले जाते. प्रादेशिक परिवहनकडून रिक्षा-टॅक्सीसाठी प्रवासी भाडे निश्चित करण्यात आलेले असतानाही या कंपन्यांकडून चालकांना तुटपुंजा मोबदला दिला जात आहे. यामुळे चालक हवालदिल झाले आहेत. हे आंदोलन करीत असताना कंपन्यांनी न्यायालयाकडून त्यांच्या आंदोलनासाठी स्थगिती आदेश मिळवला आहे. यामुळे चालकांना आपल्या हक्कासाठी लढादेखील देता येत नसल्याने आता चालकांच्या वतीने संघटना आक्रमक झाली आहे.

स्वातंत्र्यदिनी चालकाच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या कंपन्याविरोधात संघटनेचे अध्यक्ष डॉ. क्षीरसागर यांच्यासह ठाकरे गटाची वाहतूक सेनेचे अध्यक्ष नीलेश भोर यांनी चालकाबरोबर आरटीओ अधिकाऱ्यांची भेट घेत समस्या मांडण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बिहारमध्ये NDA मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षातून किती मंत्री होणार? 'या' दिवशी शपथविधी सोहळ्याची शक्यता

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Viral Video: 91व्या वर्षीही करतात 12 तास ड्यूटी! फिट राहण्याचं सिक्रेट विचारताच आजोबांनी दिलं असं काही उत्तर...नेटकरीही झाले थक्क

Solapur Political : मंगळवेढ्यात काँग्रेसचा पंढरपूरप्रमाणे आघाडीसोबत लढण्याचा पॅटर्न!

मेडिक्लेम पॉलिसी घेताना अर्ज व्यवस्थित भरून देणे गरजेचे; अपुऱ्या अर्जामुळे...

SCROLL FOR NEXT