मुंबई

मेंढवन उतारावर दुचाकीस्वार गंभीर जखमी

CD

कासा, ता. १६ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मेंढवन गावाशेजारील तीव्र उतरणीवर दुचाकीचा भीषण अपघात होऊन दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी (ता. १५) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात असलेला दुचाकीस्वार दुभाजकावर आदळल्याने हा अपघात घडला. हे ठिकाण ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखले जाते.

वसई येथील सफिक खान (वय ३०) आणि भावेश प्रजापती (२५) हे दुचाकीस्वार मोटरसायकल (क्र. एमएच ०४ सीजे ३७८६)वरून अंबोलीकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन थेट दुभाजकावर आदळले. या जोरदार धडकेत दोन्ही युवकांच्या डोके, तसेच हातपायांवर गंभीर मार लागला. चालकाने हेल्मेट परिधान केले होते; मात्र अपघाताची तीव्रता इतकी होती, की धडकेत हेल्मेट दूर फेकले गेले. दोघांना तत्काळ ‘१०८’ रुग्णवाहिकेमार्फत कासा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच चारोटी महामार्ग पोलिस निरीक्षक अमोल जाधव, पोलिस उपनिरीक्षक पऱ्हाड आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली असून पुढील तपास कासा पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गुंड पाळू नका, दोन घास कमी खा पण स्वाभिमानाने रहा; खोटं काम....; पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

Dhananjay Munde: काही जणांना आता ओबीसीतून आरक्षण हवं पण... धनंजय मुंडे पहिल्यांदा आरक्षणावर बोलले, भगवानगडावर वादळी भाषण

Dussehra Melava 2025 Live Update: मी आहे तोपर्यंत माझ्या लेकरांना आरक्षण दिलेलं मला बघायचं आहे- जरांगे पाटील

Kolhapur Shahi Dussehra : शाही दसरा सोहळा, अडीचशे वर्षांची परंपरा; हत्तींची जागा घेतली मेबॅक मोटारीने, छत्रपतींची अगवाणी पोलिस दलाकडून

Nashik News : 'पिवळं सोनं' महागलं! दसऱ्यासाठी गोदाघाटावर झेंडू फुलांची मोठी आवक, किलोला दीडशे रुपये दर

SCROLL FOR NEXT