पालघर, ता. १७ (बातमीदार) : जिल्हा परिषदेमध्ये कार्यरत असलेल्या हजारो अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक आता डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून गतीने कार्यवाही सुरू असून, हा उपक्रम मुख्यमंत्र्यांच्या १५० दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.
जिल्हा परिषदेमध्ये १० ते ११ हजार अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. सेवा पुस्तक हे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या सेवेतल्या प्रवासाचे अधिकृत दस्तऐवज असते. आजपर्यंत हे पुस्तक केवळ हस्तलिखित स्वरूपात कार्यालयीन नोंदींमध्ये जपले जात होते, मात्र बदलत्या काळानुसार त्याचे डिजिटायझेशन केल्यामुळे पारदर्शकता, वेगवान कामकाज आणि कर्मचारी हिताचे निर्णय घेणे सोपे होणार आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक कर्मचाऱ्याची नियुक्ती, बढती, बदली, वेतनवाढ, शैक्षणिक पात्रता, पदोन्नती, तसेच सेवानिवृत्तीपर्यंतची सर्व माहिती ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सेवा पुस्तकाशी संबंधित प्रमाणपत्रे, नोंदी व तपशील मिळवण्यासाठी वारंवार कार्यालयीन दार ठोठवण्याची गरज राहणार नाही.
पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी या प्रक्रियेतील पारदर्शकता आणि कार्यक्षमता यावर भर दिला आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण डिजिटायझेशनची अंमलबजावणी होत आहे. यासाठी संबंधित विभागांना आवश्यक तांत्रिक साधन सामग्री व प्रशिक्षण पुरवण्यात येत आहे. या उपक्रमामुळे प्रशासनिक कामकाजात क्रांतिकारी बदल होऊन ‘पेपरलेस ऑफिस’ या संकल्पनेला चालना मिळेल, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. डिजिटल सेवा पुस्तकामुळे भविष्यातील अनेक सेवा-सुविधादेखील अधिक सुलभ होणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.