मुंबई

खारघर गाव स्मार्ट व्हिलेजचे काम संथगतीने

CD

स्मार्ट व्हिलेजचे काम संथगतीने
तीन वर्षे उलटूनही कामे अद्याप अपूर्ण; ग्रामस्थांमध्ये नाराजी
खारघर, ता. १८ (बातमीदार) : पनवेल पालिकेच्या स्मार्ट व्हिलेज अभियानांतर्गत खारघर गावात काम सुरू होऊन तीन वर्षे उलटली तरी अद्याप काम पूर्ण न झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे.
सेंट्रल पार्क, गोल्फ कोर्स अशा विविध प्रकल्पांमुळे खारघरचे नाव जगभर ओळखले जाते. परंतु शहर निर्मिती करताना खारघर गावात सिडकोने कोणत्याही प्रकारच्या नागरी सुविधा दिल्या नाहीत. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर गावात रस्त्यावर वाहणारे सांडपाणी, उघड्या विद्युत वाहिन्या, पाण्याची तीव्र टंचाई अशा समस्यांनी खारघर गाव ग्रस्त आहे. यावर स्मार्ट व्हिलेजच्या माध्यमातून विकास करावा, अशी मागणी स्थानिक नगरसेवक प्रवीण पाटील यांनी पालिकेकडे केली होती.
पालिकेने या मागणीची दखल घेत खारघर गावाचा स्मार्ट व्हिलेजमध्ये समावेश करून विकासकामांसाठी ११ कोटी ३८ लाखांचा निधी मंजूर केला. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत जुलै २०२२ रोजी पहिल्या टप्यात चार कोटी ९४ लाख ५२ हजार रुपये निधीच्या कामाचे उद्‍घाटन केले. स्मार्ट व्हिलेजचे काम मागील तीन वर्षांपासून सुरू आहे. अद्याप हे काम पूर्ण न झाल्याने गावातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

गाव समस्येच्या गर्तेत
अनेक ठिकाणी पेव्हर ब्लॉक निखळले आहेत. गटारे उघड्या अवस्थेत आहेत. जलवाहिनी आणि मलनिःसारण वाहिन्यांचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे गाव स्मार्ट कधी होणार, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली आहे. यासंदर्भात पालिका अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, गावात काम करताना अनेक अडचणी येत आहेत. सर्वांना विश्वासात घेऊन काम करावे लागत असून, पावसाळ्यानंतर काम वेगाने सुरू होईल, असे सांगितले.

पालिकेकडून संथगतीने काम सुरू असल्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नसून, मलनिःसारण वाहिन्या तुडुंब भरल्या आहेत. पालिकेने कामाचा वेग वाढविणे आवश्यक आहे.
- बाळकृष्ण पाटील, ग्रामस्थ, खारघर गाव

शासनाच्या अमृत योजनेच्या कामामुळे विकासकामांना विलंब झाला. ठेकेदारांकडून काम संथगतीने सुरू आहे. पावसाळ्यात कामे करताना अडचणी येत आहे. पावसाळा संपताच कामे वेगात केले जाईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे.
- प्रवीण पाटील, माजी नगरसेवक

खारघर वसाहत पालिकेकडे हस्तांतरण प्रक्रिया लांबल्यामुळे काही कामे करता आले नाही. त्यात खारघरचे नाव जगभर झाले तसेच खारघर स्मार्ट गाव म्हणून ओळखले जाईल, अशा पद्धतीने गावात विकासकामे केली जाणार आहेत.
-प्रशांत ठाकूर, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT