मुंबई

सहाय्यक पोलिस आयुक्तांचा पदभार जाहीर

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : ठाणे शहर पोलिस आयुक्तालयात नव्याने हजर झालेल्या आठ सहाय्यक पोलिस आयुक्तांचा विभागनिहाय पदभार जाहीर करण्यात आला आहे. तसेच चार सहाय्यक पोलिस आयुक्तांची बदली अन्य विभागांत करण्यात आली आहे. १२ जणांना गुन्हे, आर्थिक, वाहतूक, प्रशासन आदी विभागांचा पदभार देण्यात आला आहे. यात नव्याने हजर झालेले किरण बाळासाहेब बालवडकर यांच्या खांद्यावर कल्याण वाहतूक विभागासह उल्हासनगर वाहतूक विभागाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आलेली आहे.
ठाणे शहर आयुक्तालयांतर्गत असलेल्या नौपाडा विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्त प्रिया डमाले यांची कळवा विभागात, उल्हासनगर वाहतूक विभागाचे विजय पवार यांची विशेष शाखा ३ येथे, तर कल्याण वाहतूक शाखेचे संजय साबळे यांची मुख्यालय २, याशिवाय प्रशासन विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त संध्या भिसे यांची वागळे इस्टेट वाहतूक विभागात बदली केली आहे. याचबरोबर नव्याने हजर झालेले संभाजी जाधव यांची नौपाडा विभाग, विजय मराठे यांची भिवंडी पश्चिम विभाग, दीपाली खन्ना यांची वागळे इस्टेट विभाग, रवींद्र दौंडकर यांची गुन्हे शाखा (प्रतिबंधक), नीलिमा पवार यांची विशेष शाखा १, अंजली भोईर ठाणे वाहतूक विभाग, सुरेखा कपिले यांची प्रशासन विभागात आणि किरण बालवडकर यांच्यावर कल्याण वाहतूक विभागाची जबाबदारी सोपवली आहे. या व्यतिरिक्त बालवडकर यांना उल्हासनगर वाहतूक विभागाचा अतिरिक्त कार्यभारही देण्यात आलेला आहे. या आदेशावर ठाणे पोलिस दलातील मुख्यालय १ चे पोलिस उपायुक्त डॉ. श्रीकांत परोपकारी यांची स्वाक्षरी असून संबंधित सहाय्यक पोलिस आयुक्तांना तत्काळ त्यांच्या नवीन पदाच्या ठिकाणी हजर होऊन कार्यभार स्वीकारण्याबाबत नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TET Exam Paper Leak : कोल्हापुरात टीईटीचा पेपर फोडण्याचा प्रयत्न, पोलिसांनी छापा टाकताच एकच खळबळ उडाली; शिक्षकांचाही समावेश

Viral Video : लग्नादिवशीच नवरीचा अपघात, रुग्णालयात पार पडलं लग्न, नवरदेवाने जिंकली लाखोंची मने; पाहा हृदस्पर्शी व्हिडिओ

Smriti - Palash Love story: स्मृती मानधना - पलाश मुच्छल यांची पहिली भेट कधी झाली अन् कशी सुरू झाली लव्हस्टोरी?

African Swine Fever : नाशिकमध्ये 'आफ्रिकन स्वाइन फीव्हर'चा शिरकाव! जिल्हाधिकाऱ्यांकडून 'बाधित क्षेत्र' घोषित

Viral Video 'डोला रे डोला' धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा अफलातून डान्स, व्हिडिओ चर्चेत

SCROLL FOR NEXT