मालाडमध्ये गणपती मंडप कोसळले
मालाड, ता. १९ (बातमीदार) ः सततच्या पावसाने मालाड पश्चिमेतील लिंक रोड मीठ चौकी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मंडप कोसळल्याची घटना मंगळवारी (ता. १९) घडली. सुदैवाने यात कोणी जखमी झाले नाही; मात्र मंडळाचे आर्थिक नुकसान झाले. तसेच मालवणीतील सानेगुरुजी वसाहत येथे पावसाचे पाणी शिरले होते. एमएचबी कॉलनी, मालवणी गेट क्रमांक आठ, मालवणी म्हाडा येथील कला विद्यालय परिसराचा रस्ता आणि आंबोजवाडी परिसरात पावसाचे पाणी साचले.