तळोजाकरांची पावसाने कोंडी
भुयारी मार्गात पाणी शिरल्याने पेंधरमार्गे प्रवास
खारघर, ता. १९ (बातमीदार) ः भुयारी मार्गात पाणी शिरल्यामुळे तळोजाकरांना पेंधर उड्डाणपूलमार्गे प्रवास करावा लागत आहे. तळोजा फेज एक वसाहतीचा प्रवेशद्वार असलेल्या भुयारी मार्गात पाणी तुंबल्यामुळे तीन किलोमीटर अंतर पार करून पेंधर रेल्वेफाटकमार्गे ये-जा करावी लागत आहे. रेल्वेने भुयारीमार्गातील पाण्याचा निचरा करण्यासाठी मोटार पंपची सोय केली आहे; मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वारंवार भुयारी मार्गात पाणी तुंबत असल्याने रहिवाशांची गैरसोय होत आहे. दुपारनंतर पावसामुळे पाण्यात वाढ झाली असून पंप लावून पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू आहे.