मुंबई

डोंबिवली स्थानक परिसर पाण्याखाली

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १९ : दोन दिवसांपासून कल्याण-डोंबिवली शहरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यात मंगळवारी (ता. १९) पहाटेपासून पावसाचा जोर वाढल्याने डोंबिवलीतील अनेक सखल भागात पाणी साचले आहे.
डोंबिवली स्थानक परिसर पुन्हा एकदा पाण्याखाली गेला असून, गुडघाभर पाण्यातून नागरिकांना वाट काढत मार्गक्रमण करावे लागत आहे. पूर्वेतील रेल्वेस्थानकाबाहेरील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांनी दुकाने बंद करून बाहेर बसण्याचा मार्ग पत्करला. भाजी मार्केट परिसरातही पाणी भरल्याने विक्रेते, ग्राहकांची तारांबळ उडाली. सोमवारपासून (ता. १८) पडणाऱ्या जोरदार पावसामुळे डोंबिवली पूर्वेतील रेल्वेस्थानक परिसर, भाजी मार्केट, नांदिवली मठ परिसर, समर्थनगर, एमआयडीसी निवासी विभाग, डोंबिवली पश्चिमेतील भागशाळा मैदान परिसर, कोपर रेल्वे पूल बोगदा परिसरात पाणी साचले आहे. गुडघाभर पाणी कोपर येथील रेल्वेच्या बोगद्याखाली साचल्याने नागरिकांचा मार्ग बंद झाला. पालिका प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केल्याने मंगळवारी शाळा भरल्या नाहीत; मात्र काही खासगी शाळा परीक्षा असल्याने सुरू होत्या.डोंबिवली पूर्वेतील राजाजी पथ येथे मोठे झाड रस्त्यावर पडल्याने वाहतूक काही काळ बंद पडली होती. अग्निशमन दलाने त्वरीत घटनास्थळी धाव घेत हे झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण
डांबरी रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. या खड्डयांत पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला. पाण्यामुळे खड्ड्यांच्या अंदाज येत नसल्याने अनेक दुचाकीस्वारांची गाडी त्यात अडकून बंद पडत होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Train Accident : पुलाची भिंत तोडून ट्रेनसमोर कोसळला डंपर, अर्ध्या रात्री प्रवाशांचा आरडाओरडा अन् गोंधळ; थरारक अपघाताने सगळेच हादरले

तुम्ही सर्व, गौतम गंभीरला जबाबदार का धरत आहात? सुनील गावस्करांकडून बचाव; आर अश्विन म्हणाला, कोच हातात बॅट घेऊन...

150 वर्षांचं आयुष्य! 100 व्या वर्षीही 25 सारखी तरुणाई; मानवी आयुष्य बदलणारा क्रांतिकारी शोध, शास्त्रज्ञांचा नवा फॉर्म्युला काय?

Latest Marathi News Live Update : इंडिगो पुन्हा लेट; तिकीट विमानाचे, मात्र चारचाकीने मुंबई गाठण्याची वेळ

'ठरलं तर मग' च्या सेटवर नक्की काय घडतं? सायलीने दाखवली झलक, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणतात...'मालिकेत पुढे मोठा ट्विस्ट...'

SCROLL FOR NEXT