अतिवृष्टीत जलजन्य आजारांचा धोका
नागरिकांना खबरदारीचे आवाहन
अंबरनाथ, ता. २० (वार्ताहर) : मुसळधार पावसामुळे पाणी साचणे, गटार तुंबणे आणि पाणीपुरवठा दूषित होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नागरिकांना खबरदारी घेण्याचे जाहीर आवाहन केले आहे. यासंदर्भात परिपत्रक जारी केले असून, नागरिकांना सूचना केल्या आहेत.
राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी, नाले व धरण ओसंडून वाहत असून, पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. अंबरनाथ तालुक्यातही मुसळधार पाऊस पडत असून, या पावसामुळे पाणी जास्त गढूळ झाले. यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नागरिकांना पिण्याचे पाणी उकळूनच प्यावे, घरगुती पाण्याच्या टाक्या व भांडी स्वच्छ धुवून झाकून ठेवावीत, साचलेले पाणी व उघडे नाले टाळावेत. अशा अनेक सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर आपल्या परिसरातील पाण्याच्या पाइपलाइन फुटल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित दुरुस्ती करून घ्यावी. तसेच गटारीतून जाणारी जलवाहिनी सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावी, अशा सूचना केल्या आहेत.
दरम्यान, जलजन्य आजार रोखण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पावसाळ्यात रासायनिक प्रक्रिया करण्यात येते; तरीही नागरिकांनी या काळात अतिरिक्त काळजी घ्यावी, अशा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सूचना केल्या आहेत. तसेच नागरिकांनी स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळले तरच जलजन्य आजारांवर नियंत्रण मिळवता येईल, असे आवाहन केले आहे.
काय काळजी घ्यावी?
१) पावसाळ्यात खबरदारीची उपाययोजना म्हणून पाणी उकळून व गाळून प्यावे
२) नागरिकांनी पाण्याची नळजोडणी गटारातून जात नसल्याची खात्री करावी. तसे आढळल्यास ती नळजोडणी गटारातून काढून सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावी. तसेच त्यावर गळती होत नसल्याची खात्री करावी. गळती होत असल्यास त्वरित पाइपलाइन बदलावी आणि गळती बंद करावी.
३) बहुमजली इमारतीतील ग्राहकांनी पाण्याच्या साठवण टाक्यांची स्वच्छता करावी.
४) महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य वाहिनीवर गळती झाल्याचे निदर्शनास आल्यास दूरध्वनी क्रमांकावर माहिती देण्यात यावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.