मुंबई

कासा येथे मुसळधार पावसाचे थैमान

CD

कासा, ता. २० (बातमीदार) : कासा ग्रामपंचायत परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गावातील अनेक घरांसह दुकानदारांच्या गाळ्यांमध्ये पाणी घुसल्याने लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या पाण्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

शांताराम घाटाळ, काजल मढवी, सुधीर घाटाळ, कल्पेश भोईर, जयप्रकाश कोदे, दिलीप धात्रक यांची घरे आणि नंदकिशोर परिहार व त्यांच्या चार-पाच शेजारी दुकानदार, तसेच बिरसा मुंडा चौकातील दुकानदारांच्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने ठिकठिकाणी साहित्याचे नुकसान झाले. कोणत्याही परवानगीशिवाय होणारी अनियोजित बांधकामे, ग्रामपंचायतीचे नाहरकत दाखले देण्याचे अधिकार काढून घेतल्यामुळे होत असलेले अडथळे, तसेच पाटबंधारे विभागाने पाइपलाइन घालताना मोठ्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह असणारा पाट बंद केल्याने ही परिस्थिती उद्भवत असल्याचे निदर्शनास आले, अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली.

पावसाचा जोर सुरू असतानाच सरपंच सुनीता कामडी, उपसरपंच हरेश मुकणे आणि ग्रामविकास अधिकारी आर. दिघे यांनी गुडघाभर पाण्यात उभे राहून बाधित भागाची पाहणी केली व नुकसानग्रस्त नागरिकांना धीर दिला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ग्रामपंचायत, तलाठी व मंडळ अधिकारी यांनी त्वरित मदतकार्य सुरू केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'छत्रपती शिवाजी महाराज लिंगायत समाजाचे, कन्नड वंशाचे होते'; कन्नड साहित्यिकाच्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ

Prataprao Pawar: कृषी क्षेत्रात ‘एआय’चा नवा अध्याय; प्रतापराव पवार, ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनात ‘एआय-एमएल-आयओटी’ सामंजस्य करार

Sakal Premier League: आजपासून रंगणार ‘सकाळ प्रीमिअर लीग’चा थरार; विजेत्या संघाला दोन लाखांचा पुरस्कार, विजेतेपदासाठी झुंजणार ३२ संघ

Mumbai Pune Expressway Accident: मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; कंटेनर चालकासह दोघांचा जागीच मृत्यू, चार गंभीर जखमी

India Women Kabaddi: भारत अंतिम फेरीत दाखल; महिला विश्वकरंडक कबड्डी, इराणवर मात

SCROLL FOR NEXT