कोकणात गणेशोत्सवासाठी एसटी सज्ज
दोन हजार ६७१ बस निघाल्या कोकणात
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : गणेशोत्सवासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात मुंबई-ठाण्यातून चाकरमानी हा कोकणात गणेशोत्सवासाठी जात असतो. कोकणात गावी जाण्यासाठी आजही चाकरमानी हा एसटीला पसंती देत आहे. त्यानुसार महिनाभर आधीच आरक्षण करण्यासाठी धाव घेत असतात. त्यानुसार यंदा एसटीच्या ठाणे विभागाकडून दोन हजार ६७१ बसचे नियोजन केले आहे. त्यात दोन हजार ३०२ बस या राजकीय पुढाऱ्यांनी आरक्षित केल्या आहेत. त्यानुसार २३ ऑगस्ट ते २६ ऑगस्टपर्यंत एसटी कोकणात जाण्यासाठी सज्ज झाली आहे.
कोकणातील गावा-पाड्यांवर जाण्यासाठी आजही लालपरीचाच मोठा आधार आहे. त्यामुळे कोकण म्हटले की, लालपरी असे समीकरण, एक नाते तयार झाले आहे. येत्या २७ ऑगस्टला श्रीगणेश चतुर्थी आहे. त्यानुसार गौरी-गणपती या सणाला मुख्य वाहतूक केली जाणार आहे. त्यातही मागील वर्षी राजकीय मंडळींनी एक हजार २०० बसचे बुकिंग केले होते. यंदा त्यात दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार राजकीय मंडळींकडून दोन हजार ३०२ बसचे बुकिंग झाले आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या भक्तांना मोफत बसची सुविधा उपलब्ध झाली आहे, तर मागील वर्षी कोकणात गणेशोत्सवासाठी जाण्यासाठी २,४६५ बसचे नियोजन आखले होते. यंदा त्यात २०६ ची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
दरम्यान, ठाणे, भांडुप आणि मुलुंड या डेपोतून १,१०२ बसचे नियोजन केले आहे, तर कल्याण ५३२, विठ्ठलवाडीमधून २८९ बसचे नियोजन केले आहे. यंदा मुंबई प्रादेशिक, पुणे प्रादेशिक आणि नाशिक प्रादेशिक येथील गाड्यांचा समावेश आहे.
मार्गावर लालपरीचे नियोजन
ठाणे विभागाच्या सात आगारांतून गणेशोत्सवासाठी चिपळूण, दापोली, गुहागर, खेड, साखरपा, राजापूर, रत्नागिरी, लांजा, देवगड, कणकवली, विजयदुर्ग, महाड, माणगाव, श्रीवर्धन या मार्गावर जादा बसगाड्या नियोजनानुसार आरक्षणासाठी उपलब्ध आहेत.
यंदाही सवलत लागू
शासनाने एसटी प्रवास करणाऱ्या महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना जाहीर केलेल्या सवलती यावषीर्ही असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ होण्याची शक्यता अधिक आहे. शासनाने जाहीर केलेली सवलत या कालावधीत सुरू राहणार आहे.
बससंख्येचा आलेख वाढता
ठाणे विभागातून कोकणा जाणाऱ्या बस
वर्ष बससंख्या
२०१८ ८२०
२०१९ ८२३
२०२० (कोरोना) २२८
२०२१ ८४६
२०२२ १३७२
२०२३ १९५७,
२०२४ २४६५
२०२५ २६७१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.