गणेशोत्सवानिमित्त लहान मुलांसाठी गणपती स्तोत्र स्पर्धा
अलिबाग, ता. २१ (वार्ताहर) ः अलिबागमधील आदर्श सहकारी पतसंस्थेतर्फे गणेशोत्सवानिमित्त लहान मुलांसाठी खास गणपती स्तोत्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत पाच ते १३ वर्षांच्या मुला-मुलींना सहभागी होता येणार आहे. स्पर्धकांनी स्तोत्र म्हणतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करून ९११२३०६८८८ या क्रमांकावर पाठवायचा आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्ट उच्चार आणि व्हिडिओ चांगला असणे आवश्यक आहे. स्पर्धेत प्रथम क्रमांक पाच हजार रु., द्वितीय तीन हजार रु. तर तृतीय दोन हजार रु. बक्षीस देण्यात येणार आहे. व्हिडिओ पाठविण्याची अंतिम तारीख २ सप्टेंबर असून जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.