मुंबई

बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगाराची संधी

CD

बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगाराची संधी
२५ ते ४५ वर्षे वयोगटातील उमेदवार सहभागी होण्यास पात्र
पालघर, ता. २३ (बातमीदार ) : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाअंतर्गत पालघर जिल्ह्यातील उमेदवारांना इस्राईल येथे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. इस्राईलमध्ये घरगुती सहाय्यक या क्षेत्रात युवक, युवतींना पाच हजार रोजगारांची संधी आहे. याचा जिल्ह्यातील उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.
इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान असणारे २५ ते ४५ वर्षे वयोगटातील उमेदवार या योजनेमध्ये सहभागी होण्यास पात्र आहेत. सोबतच उमेदवारांकडे काळजीवाहू घरगुती सहाय्यक सेवांसाठी निपुण, पारंगत, भारतातील नियामक प्राधिकरणाद्वारे मान्यताप्राप्त असलेले व किमान ९९० तासांचा कोर्स पूर्ण केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. भारतीय प्राधिकरणाद्वारे प्रदान केलेल्या मिडवाइफरीमधील प्रशिक्षण, संबंधित भारतीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली किंवा नर्सिंग, फिजिओथेरपी, नर्स असिस्टंटमधील प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक तसेच जीडीए, एएनएम, जीएनएम, बीएससी नर्सिंग, पोस्ट बीएससी नर्सिंगची शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
इस्राईलमध्ये नोकरी मिळवण्यासाठी महाराष्ट्रातच निवड प्रक्रिया व नियुक्तीचे वाटप केले जाणार आहे. तसेच नियुक्त्यांकडून मेडिकल विमा, राहण्याची आणि जेवणाची सोयही असणार आहे. पात्र उमेदवारांना रुपये एक लाख ६१ हजारांपर्यंत मासिक वेतन दिले जाईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुक पात्र उमेदवारांनी https://maharashtrainternational.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपली माहिती भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विश्वविजेता भारतीय संघ ५ ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेत बलाढ्य संघाला भिडणार; वर्ल्ड कपची तयारी, पण स्मृती मानधना नाही खेळणार?

Mumbai News: सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीनं बनवला एसी लोकलचा बनावट पास, कसे आले प्रकरण उघडकीस?

Viral Video: प्रवाशांच्या बॅगा थेट समुद्रात! व्हिडिओ पाहून लोक हैराण; नेमकं घडलं तरी काय?

Midlife Fitness & Yoga : चाळिशीनंतरही तरुण राहा! मसल-टोनिंगपासून हार्मोन्सपर्यंत सर्वकाही जाणून घ्या

Swanandi Mangalsutra Trend: जान्हवीनंतर आता स्वानंदीचं मंगळसूत्र ट्रेण्डवर, तेजश्रीच्या हटके स्टाईलला पसंती

SCROLL FOR NEXT