मुंबई

रायगड पोलिसांची सायकलिंग मोहीम

CD

रायगड पोलिसांची सायकलिंग मोहीम
फिट इंडियासह अमली पदार्थ विरोधी जनजागृती
कर्जत, ता. २४ (बातमीदार) : रायगड जिल्हा पोलिसांच्या वतीने फिट इंडिया आणि अमली पदार्थ विरोधी जनजागृती या मोहिमेअंतर्गत रविवारी कर्जत-खोपोली मार्गावर सायकलिंग रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. फिटनेस की डोस, अर्धा घंटा रोज, या आकर्षक घोषवाक्याखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी हिरवा झेंडा दाखवत या मोहिमेचा शुभारंभ केला.
या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये नियमित व्यायामाची सवय निर्माण करणे आणि आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे हा होता. कर्जत-खोपोली मार्गावरील नांगुर्ले ते अंजरुन या निसर्गरम्य रस्त्यावर १० किलोमीटर अंतरावर सायक्लोथॉन २०२५ स्पर्धा पार पडली. सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेत परिसरातील पोलिस अधिकारी, कर्मचारी, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, स्थानिक विद्यार्थी आणि सायकलपटूंनी उत्साहाने सहभाग नोंदवला. खोपोलीचा विश्वजित जयश्री दयानंद पोळ याने या सायकलिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून आपली क्षमता सिद्ध केली. स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या सर्व विजेत्या सायकलपटूंचा बक्षिसे आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशासाठी पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल गायकवाड, खालापूर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल, कर्जत पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप भोसले, खालापूरचे सचिन पवार, खोपोलीचे विशाल हिरे, रसायनीचे बांगर, तसेच महिला पोलिस निरीक्षक सरिता चव्हाण उपस्थित होत्या. याशिवाय कर्जत, खालापूर आणि खोपोली पोलिस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या उपक्रमाला स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परिसरातील नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून सहभागींचे स्वागत केले. रायगड पोलिसांच्या या उपक्रमामुळे कर्जत-खोपोली परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पहिल्यांदाच अशा प्रकारची सायकलिंग स्पर्धा आयोजित केल्याने पोलिसांच्या नव्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghati Medical College: ‘घाटी’तील ३५७ पदांसाठी अकरा शहरांत आजपासून परीक्षा; ‘टीसीएस’तर्फे २७ केंद्रांवर तीन सत्रांमध्ये नियोजन

Accident News : भरधाव कंटेनरची भाविकांच्या ट्रॅक्टरला धडक, ८ जणांचा जागीच मत्यू, ४३ जखमी

भारतीय संघाला स्पॉन्सर करू शकणार नाही, Dream11ने मोडला BCCIसोबतचा करार; आशिया कपसाठी जर्सीवर कोणाचं नाव?

Nanded Mumbai Vande Bharat Express: नांदेड मुंबई ‘वंदे भारत’ मंगळवारपासून धावणार

ISRO Successfully Tests: इस्रोची गगनयान मोहिमेसाठी यशस्वी इंटिग्रेटेड एअरड्रॉप चाचणी, चिनूक हेलिकॉप्टरने पाच टनाची कुपी सोडली

SCROLL FOR NEXT