मुंबई

गणेशोत्सव सजावटीसाठी बाजारपेठांत उत्साह

CD

वज्रेश्वरी, ता. २५ (बातमीदार) : दोन दिवसांनी गणरायाचे आगमन होणार आहे. त्यामुळे येथील अंबाडी नाका या मध्यवर्ती बाजारपेठेसह वज्रेश्वरी, दुगाड, कुडूस आदी ठिकाणी घरगुती गणेशमूर्ती सजावट साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. आकर्षक व पर्यावरणपूरक राजसिंहासन, मोर, अष्टविनायक मखरांना विशेष मागणी आहे. लटकन, तोरण, गुलाबाचा पट्टा यांनाही ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे. विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार यावर्षी मखर व लटकनच्या दरात साधारणपणे ५ ते ७ टक्क्यांनी वाढ झाली आहे, मात्र खरेदीवर त्याचा परिणाम झालेला नाही.
गणेशोत्सवासाठी अंबाडी, भिवंडी, कुडूस, वज्रेश्वरी आदी ठिकाणच्या बाजारपेठा गर्दीने फुलू लागल्या आहेत. घरगुती गणेशमूर्ती मखराचे सजावट साहित्य ४०० रुपयांपासून ते ५ हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. थर्माकॉलऐवजी इको–फ्रेंडली मखरांची मागणी वाढली आहे. यावर्षी विठू-माऊली, महालक्ष्मी देवी, शंकर, श्री स्वामी समर्थ, राजसिंहासन, मोर यांच्या प्रतिकृतींसह राजमहल, राजमुद्रा, मोरपंख, बालाजी, सुवर्ण मंदिर अशा विविधरंगी अनेक छोट्या, मोठ्या आकाराचे मखर बाजारपेठेत दिसत आहेत.

सजावटी सामानांचे दर
सर्वसामान्य ग्राहकाला परवडणारे लाकडी मखर हजार ते तीन हजारांपर्यंत आहेत. मखरांबरोबरच विविध प्रकारची लटकन बाजारात उपलब्ध आहेत. हे लटकन १०० ते ४५० रुपयांपर्यंत आहे. सहा फुटी लटकन ४५० रुपयांना, तर छोट्या लटकनच्या दोन नगाचा दर हा दीडशे रुपये इतका आहे. तीन फुटांचे तोरण ३५० ते ५५० रुपयांपर्यंत आहेत. गुलाबाने भरलेला सहा फुटांचा आकर्षक असा पट्टा १५०० ते ३५०० रुपयांपर्यंत विक्रीस उपलब्ध आहे.


यावर्षी लटकन, तोरण यांचे दर पाच ते सात टक्क्यांनी वाढले आहेत. पण, विक्रीवर त्याचा परिणाम झालेला नाही. गणपती सजावट साहित्य खरेदीसाठी ग्राहक गर्दी केली आहे.
- अशोक जाधव, सजावट साहित्यविक्रेते, अंबाडी नाका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navale Bridge Accident : नवले पुलावर अपघाताची मालिका सुरुच, मद्यधुंद कारचालकाचा ताबा सुटला अन्... पहाटे थरारक अपघात

Solapur Airlines: 'मुंबई ४० ते ६० टक्के तिकीट बुकिंग तिकीटही वाढले'; मुंबई ४ हजार, गोवा अडीच ते तीन हजार रुपये..

Latest Marathi News Live Update : नवी मुंबई विमानतळावरुन वॉटर टॅक्सी सुरु करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Shukra Gochar 2025: शुक्राच्या गोचरामुळे वृश्चिक राशीत येणार नवे बदल, करिअरमध्ये वाढू शकतात अडचणी

23 वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये, वयाच्या 41 व्या वर्षी मराठी अभिनेत्रीनं केलं लग्न, फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT