मुंबई

बाप्पाला पारंपरिक उकडीच्या मोदकाचा नैवेद्य

CD

बाप्पाला पारंपरिक उकडीच्या मोदकांचा नैवेद्य
गेल्या वर्षीच्या तुलनेत ८० टक्क्यांनी मागणी वाढली; मोदकाच्या पिठालाही उत्तम प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : गणेशोत्सवात प्रत्येक घरात किमान दोन दिवस तयार होणारा पदार्थ म्हणजे मोदक. उकडीच्या मोदकांना जेवढी मागणी तेवढीच मोदक बनवण्यासाठी लागणाऱ्या सुवासिक पिठालाही मागणी वाढली आहे. सध्या तयार पदार्थांची चलती असल्याने हल्ली मोदकांच्या ऑर्डर दिल्या जातात, मात्र आजही बाप्पाला पारंपरिक उकडीच्या मोदकांचा नैवेद्यच सर्वाधिक दाखवला जातो. आजही उकडीच्या मोदकांना वाढती पसंती असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास ८० टक्क्यांनी मागणी वाढली आहे.
तांदळाच्या पिठात नारळ व गुळाचे सारण भरून उकडीचे मोदक तयार केले जातात, पण गेल्या वर्षीपासून मोदकांमध्ये विविध प्रकार पाहायला मिळत आहेत. कांदिवलीतील ‘मोदकत्स्य’ हा घरगुती व्यवसाय करणाऱ्या मानसी शिवलकर यांनी सांगितले की, यंदा पारंपरिक मोदकांना सर्वाधिक मागणी आहे. गणेशोत्सवाच्या सुरुवातीचे तीन दिवस उकडीच्या मोदकांना मागणी आहे. त्यानंतर वेगवेगळ्या चवीच्या मोदकांची मागणी वाढते. महिला घरगुती बाप्पासाठी सुका मेवा केशर मोदकांची विचारणा करत आहेत. आता चर्चगेट, घाटकोपर आणि मुंबई बाहेरूनही मागणी आहे. गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट मागणी आहे. शेवटपर्यंत कॉल करूनही विचारणा केली जात आहे. या मोदकांच्या व्यवसायासाठी माझ्यासोबत महिला सहकारी आहेत. त्यांनाही आता रोजगार मिळतो असे मानसी शिवलकर हिने सांगितले.

वेगवेगळ्या चवीचे मोदक
गुलकंद, पान, आंबा, चॉकलेट, नाचणी, चिकू, अननस आणि विशेष म्हणजे चांदीचा अर्क लावलेला शाही मोदक भक्तांच्या पसंतीस पडतोय. एकूण १२ प्रकारचे वेगवेगळे सारण तयार करून उकडीचे मोदक तयार मिळत आहेत. सामान्य तापमानातही मोदक काही दिवस फ्रिजमध्ये ठेवता येतात.

श्रावणापासून मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी येते. ही मागणी दिवाळीपर्यंत कायम असते. गणेशोत्सवाच्या १० दिवसांमध्ये विक्रीमध्ये मोठी वाढ होते. यंदा काजू, विविध चवीच्या मोदकांची विक्री होत आहे.
- श्री नाथ व भूषण पैयाडे,
मालक- सद्‌गुरु हॉटेल व मिठाई

बाप्पाचा आवडता पदार्थ मोदक आहे. नैवेद्यासाठी मोदक खरेदी करतो. यंदा काजू आणि माव्याच्या मोदकांची खरेदी केली आहे.
- अदिती सावंत, ग्राहक

सुवासिक मोदकाचे पीठ
हल्ली सर्वच गोष्टी ऑनलाइन उपलब्ध असल्याने तयार मोदकाचे पीठही मिळत आहे. कांदिवलीच्या चारकोप परिसरात मंगेश आणि प्रशांत या दोन तरुणांनी ‘शुद्धमय’ नावाचा ब्रँड सुरू केला आहे. लोकांना दर्जेदार गहू, ज्वारी, बाजरी, खपली, मल्टिग्रेन, नाचणी, बेसण आणि तांदळाच्या पिठासोबत आता मोदकाचे सुवासिक पिठाचे उत्पादन केले आहे. या मोदकाच्या पिठाची गणेशोत्सवापूर्वीपासूनच बाजारात मागणी वाढली आहे.

आता मोदकाचे पीठही बाजारात सहज उपलब्ध होत असून, या पिठाची मागणी वाढली आहे. प्रत्येकाला मोदक आवडतो. त्यामुळे मोदक आणखी चांगले व्हावेत यासाठी पीठ स्वच्छ आणि चांगल्या वातावरणात तयार करणे ही आमची जबाबदारी आहे.
- प्रशांत पांजरी,
शुद्धमय, पार्टनर, कांदिवली
.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI SuryaKant किती कमवतात? सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे रॉयल पगार अन् भत्ते! एका क्लिकवर...

Pune Kolhapur Sex Case : देवदर्शनावेळी ओळख, थेट शरीरसंबंध ठेवलं अन्; पुण्याच्या महिलेचा कोल्हापुरातील पुरूषासोबत धक्कादायक प्रकार...

Latest Marathi News Live Update : खेड तालुक्यातील लादवड गावाजवळ तरूणाची गोळ्या झाडून हत्या

Eknath Shinde : पन्नास खोके सत्य घटना ! शिवसेना फुटीवेळी 'त्या'आमदाराने एकनाथ शिंदेंकडून ५० कोटी घेतले; भाजप आमदाराच्या दाव्याने खळबळ

Chhatrapati Sambhajinagar News : बोगस आयएएस महिलेचा पेशावर लष्करापर्यंत संपर्क; अफगाण दूतावासासह सापडले ११ आंतरराष्ट्रीय मोबाइल नंबर

SCROLL FOR NEXT