मुंबई

बदलापूर गावातील तलाव धोकादायक

CD

बदलापूर गावातील तलाव धोकादायक
संरक्षक कठड्याअभावी अपघाताची भीती
बदलापूर, ता. २६ (बातमीदार): बदलापूर पश्चिमेतील गाव परिसरातील जुना तलाव सध्या धोकादायक स्थितीत आहे. पालिकेने काही वर्षांपूर्वी बांधलेला हा तलाव आज अपुऱ्या देखभालीमुळे नागरिकांच्या चिंतेचा विषय ठरत आहे. संरक्षक कठडे नसल्यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत असून, या भागातील लहान मुलांचे जीव धोक्यात आल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

तलाव ‘कमळाचा तलाव’ म्हणून प्रसिद्ध असून, पावसाळ्यात पूर्णपणे भरतो; मात्र सध्या या तलावाच्या चारही बाजूंनी संरक्षक कठडे नाहीत किंवा तुटलेले आहेत. त्यामुळे तलावाच्या अगदी काठावर असणाऱ्या आदिवासी वस्तीत राहणाऱ्या ६० हून अधिक कुटुंबांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील लहान मुले तलावाजवळ खेळत असताना पाण्यात पडण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे.

पालिकेकडे दुर्लक्ष
तलावाच्या परिसरात स्वच्छतेकडेही पालिकेचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्यात तलाव काठोकाठ भरलेला असूनही, पाण्यात जंगली वनस्पती, डास व किटकांचे प्रमाण वाढले आहे, ज्यामुळे सांघिक रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

नागरिकांची तीव्र नाराजी
स्थानिक रहिवासी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाकडे या तलावाची त्वरित डागडुजी करावी, संरक्षक कठडे बसवावेत, तसेच तलावाची स्वच्छता करून परिसर आरोग्यदृष्ट्या सुरक्षित करावा, अशी मागणी केली आहे. लहान मुले तलावाजवळ खेळतात. कठडे नाहीत, कोणी कधी पडलं तर जबाबदार कोण? पालिकेने लवकरात लवकर लक्ष द्यावे, अशी स्थानिक रहिवासी मागणी करत आहेत.

आपत्तीला आमंत्रण देणारी स्थिती
धोकादायक स्थितीत जर तातडीने उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर अपघात तसेच घाणीमुळे आजाराचे प्रमाण वाढण्याचा धोका आहे. पालिकेच्या हलगर्जीचा फटका सामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav: गणपती आगमन-विसर्जनासाठी महत्त्वाची बातमी! मुंबईतील १२ पूल धोकादायक, महापालिकेचं आवाहन

Latest Maharashtra News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

World Cup 2011 Final मध्ये युवराजच्या आधी धोनीने फलंदाजीला येण्याचं खरं कारण काय? सचिन तेंडुलकरनेच सांगितलं सत्य

Selfie death: सेल्फीमुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत भारत जगात अव्वल; २७१ बळी, इतर देशांमध्ये काय परिस्थिती?

Pig: जगभरात सर्वाधिक वराह कोणत्या देशात आहेत? भारतातले कोणते राज्य आहे आघाडीवर?

SCROLL FOR NEXT