मुंबई

भिवंडीतील शेतकऱ्यांसाठी ई-पीक नोंदणी ठरतेय डोकेदुखी

CD

ई-पीक नोंदणी ठरतेय डोकेदुखी
भिवंडीतील शेतकऱ्यांना ॲप हाताळताना असंख्य अडचणी
पडघा, ता. २६ (बातमीदार) ः प्रधानमंत्री पीक विमा घेण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात जाऊन ई-पीक नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले, मात्र शासनाने उपलब्ध करून दिलेला पीक पाहणी ॲप भिवंडी तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांना हाताळता येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
प्रधानमंत्री पीक योजनेसह नुकसानभरपाई मिळण्यासाठी शासनाने मागील तीन वर्षांपासून खरीप व रब्बी हंगामात लागवड केलेल्या पिकांची ई-पीक पाहणी बंधनकारक केली आहे. खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांच्या ई-पीक पाहणीच्या नोंदी अभियानास ऑगस्टपासून प्रारंभ झाला असून, १४ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची अंतिम मुदत दिली आहे. त्यामुळे भिवंडी तालुक्यातील शेतकरी दररोज शेतात ई-पीक नोंदणी करण्यासाठी मोबाईल ॲपशी झगडावे लागत आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी दिल्लीमार्फत राबवली जात आहे. या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ वेळेत मिळण्यास अडथळा निर्माण झाला आहे. या सर्व अडचणीमुळे ई-पीक नोंदणी वेळेत पूर्ण न झाल्यास पीक विमा व इतर योजनापासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता आहे. शेतकरी बांधवांनी वेळेवर ई-पीक पाहणी पूर्ण न केल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने तातडीने सोपी व सुलभ पद्धत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भिंवडी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी केली आहे.

योजनेपासून वंचित राहण्याची भीती
खरीप हंगामासाठी ऑनलाइन पद्धतीने पीक नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, इंटरनेट कमी गती, ॲपमध्ये वारंवार येणाऱ्या तांत्रिक अडचणी व शेतकऱ्यांना ॲप हाताळण्यासाठी प्रशिक्षणाचा अभाव, अनेक शेतकऱ्यांकडे फोन नसणे, सर्व्हर डाऊन असणे. यामुळे शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया रखडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा योजनेसह विविध योजनांपासून वंचित रहावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganeshotsav: गणपती आगमन-विसर्जनासाठी महत्त्वाची बातमी! मुंबईतील १२ पूल धोकादायक, महापालिकेचं आवाहन

Latest Maharashtra News Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

World Cup 2011 Final मध्ये युवराजच्या आधी धोनीने फलंदाजीला येण्याचं खरं कारण काय? सचिन तेंडुलकरनेच सांगितलं सत्य

Selfie death: सेल्फीमुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत भारत जगात अव्वल; २७१ बळी, इतर देशांमध्ये काय परिस्थिती?

Pig: जगभरात सर्वाधिक वराह कोणत्या देशात आहेत? भारतातले कोणते राज्य आहे आघाडीवर?

SCROLL FOR NEXT