डीजेला फाटा देऊन ढोल-ताशांचा निनाद
ध्वनिप्रदूषण कमी झाल्याने नागरिकांमध्ये उत्साह
वाशी, ता. २८ (बातमीदार) ः नुकतेच घरोघरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात श्रींची प्रतिष्ठापना उत्साहात झाली, तर गुरुवारी दीड दिवसांच्या गणेशाला निरोपदेखील देण्यात आला, मात्र या वेळी घरगुतीसह अनेक मंडळांनी गणेशाचे आगमन तसेच निरोपाला डीजेला फाटा देऊन ढोल-ताशांना सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे यंदा ध्वनिप्रदूषण काहीसे कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे, तर यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी अनेक मंडळांचे आभार मानले आहेत.
नवी मुंबईत सार्वजनिक गणेश मंडळांसह नवी मुंबईकरांनी गणेशाचे पांरपरिक ढोल-ताशांच्या गजरात, फुलांची उधळण व फटक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले, तर दीड दिवसाच्या बाप्पाला निरोपदेखील उत्साहात देण्यात आला. या वेळी मात्र नवी मुंबईत बहुतेक मंडळांनी डीजेला फाटा देत गणरायाची पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली. त्यामुळे अबालवृद्धांचा उत्साह द्विगणित झाला. डीजेच्या गोंगाटामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. शिवाय ज्येष्ठ मंडळी, रुग्णांना या डीजेच्या आवाजाचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे यंदा बहुतेक मंडळांनी डीजेला फाटा दिल्याचे दिसून आले. नवी मुंबईत बुधवारी वाशी, ऐरोली, सीबीडी बेलापूर, नेरूळ आदी पट्ट्यात पांरपरिक ढोल-ताशांच्या गजरात गणेशाचे आगमन झाले. यामध्ये पारंपरिक वाद्यांचा सर्वाधिक वापर केल्याचे दिसून आले. त्यामुळे काही प्रमाणात ध्वनिप्रदूषणदेखील कमी झाल्याचे सांगण्यात आले.
..........................
यंदा पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा कल वाढला असून, सेंद्रीय आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या छोट्या आकाराच्या मूर्तींचीदेखील काही प्रमाणात विक्री झाली. विक्रेत्यांच्या माहितीनुसार, नवी मुंबईत यंदा सुमारे २० ते २५ हजार मूर्तींची विक्री झाली. गणेश चतुर्थीच्या दिवशी पावसामुळे थोडेसे अडथळे आले तरी भक्तांचा उत्साह कमी झाला नाही. दीड दिवसांच्या बाप्पाला निरोप देताना उत्साह कायम राहिला. कोरोना निर्बंधानंतरही नागरिकांनी कृत्रिम तलावांचा वापर करून विसर्जन केले. नवी मुंबईत १४४ पालिकेकडून तयार केलेल्या तलावांमध्ये मूर्ती विसर्जन यशस्वी झाले. गणेशोत्सवाच्या पारंपरिक व आधुनिक मिश्रित उत्सवात ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण, फटाके आणि इकोफ्रेंडली मूर्ती यांचा संगम दिसून आला. नवी मुंबईकरांचा उत्साह, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी यंदादेखील भव्य स्वरूपाने प्रकट झाली.
....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.