मुंबई

आली आली गौराई...

CD

आली आली गौराई...
माहेरवाशीणींची पूजनाची लगबग, खरेदीची जय्यत तयारी
पनवेल, ता. ३० (बातमीदार)ः ‘गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात आता सोनपावलांनी गौराईचे उद्या रविवारी (ता. ३१) घरोघरी आगमन होणार आहे. त्यामुळे गणरायाच्या पाठोपाठ गौरीचे आगमन होणार असल्याने पूजनाची जय्यत तयारी पाहायला मिळत आहे.
पनवेल परिसरात गौराईसाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचे चित्र होते. गौराईंच्या आकर्षक मुखवट्यांसह दागिने, साड्या खरेदीची लगबग सुरू आहे. गौराईंचे मुखवटे कापडी, शाडू, फायबर आणि पीओपीच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. फेटे असणाऱ्या गौरी यंदा सणाचे वैशिष्ट आहे. विविध रंगांचा वापर करून केलेले मुखवटे आकर्षण ठरत आहेत. हजारापासून ते पाच हजार रुपयांपर्यंत मुखवटे उपलब्ध आहेत. महत्त्वाचे म्हणजे, सुरुवातीच्या काळात गौरीचे मुखवटे पारंपरिक असायचे; परंतु पाच-सहा वर्षांत वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे बाजारात उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे महिलांकडून आकर्षक मुखवट्यांना मागणी आहे.
---------------------------------
३६ भाज्यांचा नैवेद्य
तीन दिवसांच्या मुक्कामासाठी घरी येणारी महालक्ष्मी संतुष्ट राहावी, तिच्या पाहुणचारात कुठेही कमतरता राहू नये, म्हणून महिला कामाला लागलेल्या आहेत. फुलोऱ्यासाठी करंज्या, पापड्या, वेण्या, अनारसे, लाडू, चकल्या असा फराळ तयार करण्यासाठी आठवडाभरापासून लगबग सुरू झाली आहे.
पहिला दिवस त्यांच्या आगमनाचा असतो. तर दुसरा दिवस त्यांचा पाहुणचार, पक्वान्नांचा नैवेद्य दाखवला जातो. तिसरा दिवस त्यांच्या विसर्जनाचा असतो. गौराईसाठी गोड पुरणपोळी, ३६ भाज्यांचा नैवेद्य बनवला जातो.
----------------------------------------
फळांना मागणी
पूजेसाठी केळी, सफरचंद, पेरू, चिकू, सीताफळ, डाळिंब यांसह विविध फळांना बाजारात मोठी मागणी वाढली आहे. तसेच उत्सव कालावधीत प्रसादासाठी सफरचंद, केळ्यांसह फळांना मागणी टिकून राहणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
-----------------------
गौरीचे घरी आगमन होणार आहे. त्यामुळेच सर्व नातेवाईक, आप्तेष्ट जमले आहेत. सर्वकाही विधिवत व्हावे म्हणून पुरोहितांची वेळ घेतली आहे.
- कोमल नेवसे, गृहिणी, कळंबोली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या आंदोलनाला आजही परवानगी; तिसऱ्या दिवशीही मराठा आंदोलकांचे हाल

निराधार मुलांच्या विकासासाठीची प्रयोगशाळा!

माेठी बातमी!'महिलांना लुटणाऱ्याचा एन्‍काउंटर'; सातारा पोलिसांवर पुणे जिल्ह्यातील शिक्रापुरात हल्‍ला, २२ गंभीर गुन्हे

आजचे राशिभविष्य - 31 ऑगस्ट 2025

Sunday Breakfast Recipe: रविवारी सकाळी नाश्त्यात बनवा चवदार ज्वारी अन् दुधी भोपळ्याचे अप्पे, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT