मुंबई

खारघरवासियांची कृत्रिम तलावात अधिक पसंती

CD

खारघरवासीयांची कृत्रिम तलावाला अधिक पसंती
खारघर, ता. १ (बातमीदार) : खारघरमधील बहुतांश गणेशभक्तांनी गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावाला अधिक पसंती दिल्याचे दिसत असून, दीड आणि पाच दिवसांचे मिळून १,२३० भक्तांनी कृत्रिम तलावात गणपती विसर्जन केल्याचे प्रभाग अधिकाऱ्यांनी सांगितले.
पनवेल पालिका प्रशासनाने पर्यावरणपूरक गणेशोत्‍सव साजरा व्हावा, याविषयी आवाहन केले होते. त्यामुळे खारघरवासीयांनी यावर्षी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती आपल्या घरी बसवलेल्या पाहायला मिळाल्या. गणपती विसर्जनासाठी पालिकेने खारघर सेक्टर- ३४ साई मन्नत, हाईड पार्क, स्वप्नपूर्ती व व्हॅलीशिल्प सेक्टर- ११ खेळाचे मैदान, सेक्टर-१४ कामधेनू इमारतीलगत, ग्राम विकास भवनासमोर, गावदेवी मैदान, सेक्टर-४, ६, ७ आणि सेक्टर-१५ स्वर्ण गंगा ज्वेलर्स शेजारी, सेक्टर -१६ येथे कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे. कृत्रिम तलावात गणपती विसर्जन करणाऱ्या गणेशभक्तांना पालिकेकडून प्रशस्‍तिपत्र दिले जात आहे. गौरी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी कृत्रिम तलावात विसर्जनाला अधिक प्रतिसाद मिळेल, अशी शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation : शिवरायांची शपथ घेऊन सांगितलेले, मराठ्यांना आरक्षण देणारच; एकनाथ शिंदेंनी केली 'त्या' घोषणेची आठवण

CM Fadnavis reaction: ‘’मला दोष दिले, शिव्या दिल्या तरीही मी...’’ ; जरांगेंनी उपोषण थांबवलं अन् फडणवीसांनी केलं मोठं विधान!

Maratha Reservation : मराठा समाजास आरक्षण मिळाल्यानंतर तुळजाभवानी मातेची आरती, तुळजापूरात आनंदोत्सव

Pune Crime : आंबेगावमध्ये आंदेकर टोळीचा खुनाचा कट उधळला; भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई

Latest Marathi News Updates: मनोज जरांगेंच्या कुटुंबियांनी साजरा केला आनंद

SCROLL FOR NEXT