मुंबई

मराठा आंदोलन ; जेवण घेवून जाणारी वाहने पोलिसांनी रोखली

CD

आंदोलकांचा अन्नपुरवठा खंडित
जेवण घेवून जाणारी वाहने पोलिसांनी रोखली; कार्यकर्त्यांनी व्यक्त केला संताप
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १ : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांसाठी जेवण घेऊन निघालेल्या वाहनांना मुंबईच्या वेशीवर अडविण्यात आल्याने कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणा देत परिसर दणाणून टाकला. त्यामुळे काही काळ येथील परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिसांनी ही वाहने सोडली.
मुंबईतील आझाद मैदान येथे २९ ऑगस्टपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून मराठा बांधव मुंबईत मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. मराठवाडा आणि विदर्भामधील मराठा आंदोलकांचा सहभाग जास्त असून, या भागातील घराघरातून आंदोलकांसाठी चटणी, भाजी, भाकर देण्यात येत आहे. हे जेवण गोळा करून ते वाहनाने मुंबईतील आंदोलकांपर्यंत पोहोचविण्याचे काम मराठा समाजाचे कार्यकर्ते करीत आहेत.

कल्याणमधून अन्नछत्र
कल्याणमधील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शनिवारपासून मुंबईत अन्नछत्र सुरू केले आहे. कल्याणच्या बाजारातून भाजीपाला तसेच इतर साहित्य मुंबईत सकाळी नेण्यात येते आणि तिथेच जेवण बनवून मराठा आंदोलकांना देण्यात येत आहे. ठाणे शहराच्या वागळे इस्टेट परिसरात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. या भागातून मुंबईतील मराठा आंदोलकांना फळ, बिस्कीट आणि पाणी असा पुरवठा करण्यात येत आहे.

परिसरात तणाव
सोमवारी दुपारी ठाणे शहरातून मराठा समाजाचे कार्यकर्ते घराघरातून चटणी, भाकर, चपाती असे अन्नपदार्थ गोळा करून मुंबईच्या दिशेने जात होते. ही वाहने मुंबईच्या वेशीवरील आनंदनगर नाक्यावर पोलिसांनी अडवून धरली. यामुळे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करीत घोषणाबाजी सुरू केला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पोलिसांनी ही वाहने सोडली, अशी माहिती मराठा मोर्चाचे पदाधिकारी पांडुरंग भोसले यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sandip Kshirsagar: आमदार क्षीरसागरांचा भाऊ भाजपच्या वाटेवर; निवडणुकांपूर्वी बीडमध्ये घडामोडींना वेग

Latest Marathi Breaking News: चारकोप विधानसभा: गुजराती, बंगाली, ओडिया, भाषेत मतदारांची नावे

Yuvraj Singh : 'तो मार खाईल, रडेल, मरेल, पण तो कधीच...', युवराजने अभिषेक शर्माची केली पोलखोल; पाहा Video

Vipraj Nigam: 'करिअर उद्ध्वस्त करेन'! आयपीएलच्या स्टार खेळाडूला महिलेकडून जीवे मारण्याची धमकी, कोण आहे 'हा' खेळाडू?

Pargaon News : मर्यादित साधने आणि आर्थिक अडचणीवर मात करत समीर झाला भारत सरकारच्या मंत्रालयमध्ये सहाय्यक महाव्यवस्थापक

SCROLL FOR NEXT