मुंबई

रेतीबंदर रोडवरील खड्डे भरण्यास सुरूवात

CD

रेतीबंदर रोडवरील खड्डे भरण्यास सुरुवात
टाटा प्रोजेक्टकडून दुरुस्तीचे काम
डोंबिवली, ता. ४ : गेल्या काही महिन्यांपासून खड्ड्यांनी जीव मेटाकुटीला आणलेल्या डोंबिवलीतील मोठागाव ते रेतीबंदर मार्गावरील खड्डे अखेर बुजवण्यास सुरुवात झाली आहे. विशेष बाब म्हणजे, हे काम कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निधीशिवाय करण्यात येत असून, टाटा प्रोजेक्ट कंपनीकडून ‘अस्फाल्ट मास्टिक’ तंत्रज्ञानाद्वारे खड्डे बुजवले जात आहेत.

डीएफसीसीआयएल प्रकल्पाच्या कामामुळे या मार्गावरून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होती. परिणामी, रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले होते. नागरिकांना दररोज अपघाताचा धोका आणि वाहतुकीच्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या समस्येवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी लक्ष घातले. त्यांनी टाटा प्रोजेक्ट कंपनीकडे वारंवार मागणी केली; मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी थेट डोंबिवलीतील टाटा प्रोजेक्टचे काम रोखण्याचा इशारा दिला. त्यानंतर कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत रस्ता दुरुस्त करण्यास मान्यता दिली.

गणेशोत्सवात दिलासा
सध्या अस्फाल्ट मास्टिक टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, त्यामुळे वाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना या रस्त्याचा उपयोग करताना मोठा दिलासा मिळणार आहे, असे दीपेश म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs Australia 2nd ODI : रोहित शर्माला शेवटची संधी? गौतम गंभीरचा प्लॅन बी तयार; युवा खेळाडूकडून करून घेतला कसून सराव...

Kolhapur Accident : ‘मामा... असं कसं झालं हो..!, कोणावरही वेळ येऊ नये अशी कांबळे कुटुंबावर आली; भाच्याने फोडलेला टाहो काळीज फाडणारा...

CM Yogi Adityanath : 'राजकीय इस्लाम'मुळे सनातन धर्माचे सर्वात मोठे नुकसान; शिवरायांचा उल्लेख करत CM योगी म्हणाले, 'आपल्या पूर्वजांनी...'

Accident Side Story : कोल्हापूर अपघात घटना, तिघांच्या मृत्यूने गाव हळहळलं; फुलांच्या माळा, मिठाईचे डबे, दिवाळी खरेदी पिशव्या पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू...

Bhau Beej Travel: भाऊबीजच्या दिवशी भावाला घेऊन जा 'या' खास ठिकाणी; आठवणी ठरतील खास!

SCROLL FOR NEXT