मुंबई

लाखोंची वीजचोरी; तिघांविरोधात गुन्हे दाखल

CD

लाखोंची वीजचोरी; तिघांविरोधात गुन्हे दाखल
ठाणे, ता. ४ (सकाळ) : स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वीजमीटरची वीजगणना कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक वीजमीटरच्या आतमधील सर्किटमध्ये छेडछाड करून अनधिकृतरित्या विजेचा वापर करणाऱ्या तिघांविरोधात वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी टोरेंट पॉवर या कंपनीच्या एक्झिक्यूटिव्ह सायली दाभाडे यांनी दिलेल्या वेगवेगळ्या दोन तक्रारींनुसार त्या तिघांविरोधात वीजचोरीचे गुन्हे नोंदवण्यात आल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.
संबंधित कंपनीचे टेक्निशियनमार्फत मुंब्र्यात वीजपुरवठाबाबत तपासणी केली असता, शमशाद नगर येथील फरहान काझी व समीर अन्सारी या दोघांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वीजमीटरच्या आतमधील सर्किटमध्ये छेडछाड करून अनधिकृतरित्या विजेचा वापर करून १४ हजार ९४४ युनिटचा वापर केला. अशाप्रकारे त्यांनी पाच लाख १२ हजार ५४० रुपयांची वीजचोरी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे, तर दुसऱ्या तक्रारीत कादर पॅलेस येथे राहणाऱ्या अन्सारी कौसर बानो यांनी ही स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वीजमीटरच्या आतमधील सर्किटमध्ये छेडछाड करून अनधिकृतरित्या विजेचा वापर करून नऊ हजार ५०८ युनिटचा वापर केला. अशाप्रकारे त्यांनी दोन लाख ९३ हजार सहा रुपयांची वीजचोरी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार तिघांविरोधात वीज अधिनियम २००३ चे कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उत्साहाला गालबोट! पुण्यात ४ तर शहापूरमध्ये ५ जणांचा मृत्यू, कोल्हापूरसह सांगलीत मिरवणुकीत वाद... विसर्जनादरम्यान कुठं काय घडलं?

Ganpati Visarjan 2025 Live Updates : कार्तिक आर्यनने गणपती बाप्पाला निरोप दिला

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

IndiGo flight technical glitch: कोचीहून अबुधाबीला १८० प्रवाशांसह निघालेल्या इंडिगो विमानात उद्भवला तांत्रिक बिघाड अन् मग...

SCROLL FOR NEXT