मुंबई

संघर्ष समितीची प्रभागरचनेवर हरकत

CD

प्रभागरचनेवर संघर्ष समितीचा आक्षेप
२७ गावे महापालिकेतून वगळण्याची मागणी कायम
कल्याण, ता. ४ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप प्रभागरचनेवर हरकती नोंदवण्याचा गुरुवार शेवटचा दिवस होता. याच पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने महापालिकेतील २७ गावे वगळावीत, ही मागणी पुन्हा एकदा ठामपणे मांडली असून, या मागणीस पाठिंबा देत सुमारे साडेतीन हजार हरकती नागरिकांकडून नोंदविण्यात आल्या आहेत.

ही समिती गेल्या ४२ वर्षांपासून २७ गावांना महापालिकेपासून स्वतंत्र करण्यासाठी कार्यरत आहे. समितीच्या म्हणण्यानुसार, या गावांचा समावेश महापालिकेत करण्यास त्यांनी नेहमीच विरोध दर्शवला आहे. यापूर्वी २०१५ आणि २०२० मध्ये शासनाकडून काही गावे वगळण्याबाबत अधिसूचना निघाल्या होत्या; परंतु न्यायालयीन स्थगितीमुळे निर्णय रखडला. समितीने आक्षेप घेतला आहे, की हे प्रकरण अद्याप सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असतानाही, या गावांमध्ये स्वतंत्र प्रभागांची रचना करण्यात आली आहे. ही बाब निवडणूक आयोगाच्या तसेच केडीएमसीच्या नियमाविरुद्ध आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

खासदार सुरेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, संघर्ष समितीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आज केडीएमसी कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित राहून हरकती सादर केल्या. समितीने आयुक्तांकडे मागणी केली, की त्यांच्या म्हणण्याला सुनावणीमध्ये गंभीरतेने विचारात घेण्यात यावे आणि त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'अरे ९० वर आहे, आऊट होईल...'! खेळाडूने स्लेजिंग केली, Vaibhav Suryavanshi चा 'Cute' रिप्लाय; मोडला गिल, AB चा विक्रम...

Pune News : दौंडमध्ये SRPF च्या ७१ व्या दीक्षांत संचलनात ३१६ नवप्रविष्ठांना कर्तव्यशपथ; आधुनिक युद्धतंत्राची तयारी सुरू!

Latest Marathi News Live Update : शनैश्वर देवस्थानचा कारभार विश्वस्तांनीच पहावा, उच्च न्यायालयाचा आदेश

Google Search : रात्रीच्या वेळी मुली गुगलवर सर्वांत जास्त काय सर्च करतात? 2025 च्या धक्कादायक डेटामुळे जग हादरलं

Manchar News : मंचरमध्ये हुतात्मा बाबू गेनू प्राण ज्योतीचे जल्लोषात स्वागत; घोषणांनी दुमदुमला छत्रपती शिवाजी महाराज चौक!

SCROLL FOR NEXT