मुंबई

स्विकृत नगरसेवकांची संख्या वाढविण्यात यावी

CD

स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढविण्यात यावी
सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग तीर्थे यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन
तुर्भे, ता. ४ (बातमीदार) ः नवी मुंबई महापालिकेमधील स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाचवरून १० करण्यासंदर्भात शासन निर्णय काढण्यात यावा, अशी मागणी तुर्भे येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग गोविंद तीर्थे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महापालिकांमध्ये स्वीकृत नगरसेवकांची संख्या १० करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय लहान महापालिकांमध्ये सदस्यसंख्येच्या १० टक्के स्वीकृत नगरसेवक होऊ शकतात, असा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र त्याबाबतचा शासकीय अध्यादेश (जीआर) अद्याप काढण्यात आलेला नाही. सरकारच्या निर्णयानुसार मुंबई महापालिकेच्या अधिनियमानुसार १० नामनिर्देशित सदस्य आणि महाराष्ट्र महापालिकांमध्ये १० टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाहीत किंवा १० महापालिका सदस्य, यापैकी जे कमी असेल अशी सुधारणा करण्याचा तत्त्वतः निर्णय घेण्यात आला. तसेच याबाबत महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्त्यांचा प्रथम अभिप्राय घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिका अधिनियम आणि महाराष्ट्र महापालिका अधिनियममध्ये नामनिर्देशित करावयाच्या महापालिका सदस्यांचे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सध्या महापालिकांतील नामनिर्देशित करावयाच्या पालिका सदस्यांची संख्या पाच आहे, असे पांडुरंग तीर्थे यांनी निवेदनात नमूद केले आहे. राज्यात शहरी प्रशासनास सहकार्य करण्यासाठी अनुभवी, कार्यकुशल आणि नागरी प्रशासनाचे ज्ञान असलेल्या तसचे शासनाने केलेल्या नियमानुसार विहित अर्हता धारण करणाऱ्या व्यक्तींची निवड नामनिर्देशित सदस्य म्हणून केली जाते. नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्त केलेल्या सदस्यांच्या ज्ञानाचा वापर करून महापालिकांच्या कामकाजात गुणात्मक वाढ करण्याच्या उद्देशाने संख्येत वाढ करण्याची आवश्यकता विचारात घेऊन त्याबाबत शासन निर्णय काढण्यात यावा, अशी मागणीही पांडुरंग गोविंद तीर्थे यांनी निवेदनात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lionel Messi in India : लिओनाल मेस्सीचं भारतात आगमन! फुटबॉलप्रेमींकडून फटाक्यांची आतषबाजी, एक झलक पाहण्यासाठी तोबा गर्दी; पाहा VIDEO

Teacher Video Viral : अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन; शाळेत घुसून शिक्षकाला बेदम मारहाण, व्हिडिओ तुफान व्हायरल

Latest Marathi News Live Update : पंढरपूरहून तिरुपतीसाठी आजपासून नवी रेल्वे, अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण

'लोकांचं माझ्यावर प्रेम म्हणून ते ट्रोल करतात' गौतमी पाटील ट्रोलिंगवर पहिल्यांदाच बोलली, म्हणाली...

Pune Book Mahotsav : ‘लार्जेस्ट डिस्प्ले’चा विश्वविक्रम; भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याला अनोखे अभिवादन

SCROLL FOR NEXT