मुंबई

दहशत माजवणाऱ्या आरोपीची धिंड

CD

दहशत माजवणाऱ्या आरोपीची धिंड
उल्हासनगर, ता. ८ (वार्ताहर) : विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आशेळेगाव-पाडा परिसरात तलवारीच्या धाकावर दहशत माजवणाऱ्या गुंड सुमीत उर्फ लाला कदमला पोलिसांनी अखेर गजाआड केले आहे. हा गुंड महिलांसह अनेकांवर हल्ला करून गाड्या आणि दुकाने फोडत दहशत निर्माण करत होता. अखेर पोलिसांनी त्याची थेट धिंड काढून नागरिकांसमोर उभे करून दहशत संपवली आहे. सुमीत कदमने या परिसरात तोडफोड केली. तलवारीने अनेकांवर आक्रमण करून त्यांना गंभीर जखमी केले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गंभीर परिस्थितीवर आमदार सुलभा गायकवाड यांनी विधानसभेतही सरकारचे लक्ष वेधले होते.

पोलिस उपायुक्त सचिन गोरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी, आणि पोलिस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. पोलिस उपनिरीक्षक बंकटस्वामी दराडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने काटेकोर नियोजन करून सुमीत कदमला अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी रविवारी गुन्हेगाराची धिंड काढली, म्हणजेच त्याला परिसरातील नागरिकांसमोर उभे करून, स्पष्टपणे दाखवले की गुन्हेगारी सहन केली जाणार नाही. हा प्रयोग नागरिकांचा पोलिसांवरचा विश्वास वाढविण्यासाठी आणि गुन्हेगारांना कठोर धडा शिकविण्यासाठी केला गेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar: मूळ टार्गेट वेगळं होतं, आयुष कोमकरला कसं संपवलं? गुन्हेगारांचा संपूर्ण प्लॅन समोर, पुणे पोलिसांनी काय सांगितलं?

Nagpur Railway Update : विदर्भ आणि पंचवेली एक्स्प्रेसला नवीन थांबे, प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेचा निर्णय

Latest Marathi News Updates: मुसळधार पावसामुळे धामणी धरण ओव्हरफ्लो, जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Koregaon News: 'कोरेगावात नवीन पाच बसचे लोकार्पण'; आगारात मान्यवरांच्या हस्ते पूजन, प्रवाशांसाठी दळणवळण सेवा सुलभ

Education News : दीडशे कोटींच्या थकबाकीने शिक्षक हैराण; सेवानिवृत्त व रात्रशाळा शिक्षकांवर आली उपासमारीची वेळ

SCROLL FOR NEXT