मुंबई

विसर्जनाचे कृत्रिम तलाव डेंगी, मलेरियाचे नवे अड्डे

CD

विसर्जनाचे कृत्रिम तलाव डेंगी, मलेरियाचे नवे अड्डे
ठाणे शहर, ता. ९ (बातमीदार) : ठाण्यात डेंगी-मलेरियाने हैदोस घातल्याचे दिसत असतानाच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी तयार केलेल्या कृत्रिम तलाव आणि लोखंडी टाक्यांमधील पाणी मलेरिया, डेंगी डासनिर्मितीसाठी पूरक ठरत असल्याचा धोका निर्माण झाला आहे. कृत्रिम घाट परिसरात माती, चिखल असून दूषित पाण्याने दुर्गंधी पसरत आहे. पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी महापालिकेने कृत्रिम घाट तयार केलेले असले तरी ते आता डेंगी, मलेरियाचे आजार पसरविणारे नवे अड्डे बनू नयेत, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
पर्यावरणाच्या दृष्टीने सहा फुटापेक्षा कमी उंचीच्या मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम व्यवस्था ठाणे महापालिकेने ही निर्माण केली होती. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे; मात्र आता ज्या ठिकाणी कृत्रिम व्यवस्था निर्माण केल्या आहेत, त्यांची तत्काळ विल्हेवाट लावणे गरजेचे झाले आहे. यंदा शहरात डेंगी, मलेरियाचे रुग्ण वाढल्याचे दिसत असतानाच ठाण्यात अनेक ठिकाणी तलाव रिकामे पडले आहेत, तर काही ठिकाणी मूर्ती विसर्जन झाल्यानंतर पाणी दूषित अवस्थेत जमा असल्याचे दिसत आहे. काही कंटेनरमध्ये तर या साचलेल्या पाण्यात डासांची पैदास सुरू होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. यामुळे साथरोग फैलावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. विसर्जनानंतर तलाव व कंटेनर त्वरित रिकामे करून निर्जंतुकीकरण केले गेले नाही, तर पर्यावरणपूरकच्या नावाखाली केलेला प्रयोग ठाणेकरांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतो, अशी भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: एलबीएस मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार! बीएमसी साडेचार किमीचा नवा उड्डाणपूल बांधणार, वाचा संपूर्ण मेगाप्लॅन

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध का झाला पराभव? उपकर्णधार रिषभ पंतने सांगितली टीम इंडियाची चूक

Viral Yoga Video : छतावर योगा करत होती तरुणी, माकडाने केली हुबेहुब नक्कल; व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांनी केली प्रशंसा

हृदयद्रावक! 'पतीच्या मृत्यूच्या धक्क्याने पत्नीनेही सोडले प्राण'; ८० वर्षे एकत्र संसार, करमाळा तालुक्यातील घटना..

Viral Video : सर्जरीनंतर अभिनेत्रीने दाखवते 825 ग्रॅमचे सिलिकॉन ब्रेस्ट, नवीन लुकवर नेटकरी म्हणाले, ‘हे तर पूर्ण बदललंय’

SCROLL FOR NEXT