मुंबई

ज्ञानदानाचा मार्ग खडतर

CD

ज्ञानदानाचा मार्ग खडतर
जिल्ह्यातील ७०७ अंगणवाड्या भाड्याच्या जागेत, सुविधांचा अभाव
अलिबाग, ता. १० (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यातील ७०७ अंगणवाडी केंद्रांना स्वतःची इमारत नसल्यामुळे ग्रामपंचायत इमारत, समाजमंदिर किंवा अन्य ठिकाणी चिमुकल्यांना अभ्यासाचे धडे गिरवावे लागत आहेत. त्यामुळे शिक्षणाचा शुभारंभ होत असलेल्या ज्ञानमंदिरांची अवस्था अतिशय बिकट झाली असून, दर्जेदार, मोकळ्या वातावरणातील शिक्षणाच्या अधिकारापासूनच वंचित राहण्याची वेळ मुलांवर आली आहे.
जिल्ह्यात तीन हजार १६१ अंगणवाड्या आहेत. यापैकी दोन हजार ४५४ अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत असल्याने भौतिक सुविधा उपलब्ध आहेत. उर्वरित अंगणवाडी केंद्रांना मात्र स्वतंत्र इमारती नाहीत. लहान मुलांना मोकळ्या आणि हवेशीर वातावरणात शिक्षण देणे गरजेचे आहे. अनेक अंगणवाड्यांना हक्काची जागा नसल्यामुळे अपुऱ्या आणि सोयी-सुविधांचा अभाव असलेल्या ठिकाणी अंगणवाड्या चालवण्यात येतात.
-------------------------------------------
पोषण आहाराची अडचण
भाड्याच्या जागेत अंगणवाड्या चालतात, अशा ठिकाणी जागेची अडचण जाणवते. परिणामी पोषण आहार शिजवताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे अंगणवाड्यांना हक्काची जागा मिळणे गरजेचे आहे.
---------------------------------
चिमुकल्यांच्या खेळण्यावर मर्यादा
लहान मुलांना खेळण्याची विशेष आवड असते. हसत-खेळत शिक्षणाचे धडे दिले तर त्यांचा विकासही चांगला होतो. मात्र जागेची समस्या असल्याने चिमुरड्यांच्या खेळण्यावरच मर्यादा आल्या आहेत. लोकवस्तीत अंगणवाड्या असल्याने मुलांना खेळवायचे कसे, असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे.
-------------------------------------
मुलांच्या अभ्यासावर परिणाम
जिल्ह्यात तीन हजार १६१ अंगणवाड्या कार्यरत आहेत. यामधून मुलांना ज्ञान दिले जाते. पण हक्काची जागा नसल्यामुळे लोकवस्तीत तसेच भाड्याच्या खोलीत असलेल्या ज्ञानमंदिरांचा आजूबाजूचा गोंगाटामुळे मुलांच्या अभ्यासावर विपरित परिणाम होण्याची भीती जास्त आहे.
-------------------------------------
अंगणवाड्यांच्या इमारतींची सद्यःस्थिती
तालुका संख्या स्वतंत्र
अलिबाग २७८ २३०
कर्जत ३२८ २८१
खालापूर २०४ १६२
महाड ३२० २११
माणगाव ३२० २१८
तळा ९६ ८१
म्हसळा १०८ १०२
मुरूड ११३ ९१
पनवेल २७२ २१०
पेण ३०९ २३४
रोहा २५८ २०४
पोलादपूर ११८ ८८
श्रीवर्धन १३४ १२६
सुधागड १७० १२२
उरण १२३ ९४
-----------------------------
जिल्ह्यात तीन हजार १६१ अंगणवाड्या असून, यापैकी दोन हजार ४५४ अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारती आहेत. इमारती नसलेल्या ठिकाणी ग्रामपंचायत इमारत, जिल्हा परिषद शाळा, समाजमंदिरात पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
-निर्मला कुचिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: सूर्यकुमारने UAE चा फलंदाज आऊट असतानाही फलंदाजीला परत का बोलावलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण

KP Sharma Oli reaction : नेपाळमध्ये 'GEN-Z'च्या हिंसक आंदोलनामुळे पंतप्रधानपद सोडावं लागलेल्या ओली यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले...

उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा मोठा निर्णय! सबळ कारणाशिवाय पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर; आरोपीस ताबडतोब मुक्त करण्याचा आदेश

Asia Cup, IND vs UAE: ५ षटकार अन् ४ चौकार... भारताचा फक्त २७ चेंडूत विजय! युएईला दिला धोबीपछाड

Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यातील संमेलनाला एक कोटी अतिरिक्त निधी, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; बोधचिन्हाचे अनावरण

SCROLL FOR NEXT