मुंबई

मोहने येथील प्रस्तावित सिमेंट प्लांटला विरोध

CD

मोहने येथील प्रस्तावित सिमेंट प्लांटला विरोध
कल्याण, ता. ११ (बातमीदार) : मोहने गावाजवळ एका सिमेंट कंपनीने सहा एमएमटीपीए (मिलियन मेट्रिक टन पर वर्ष) क्षमतेचे स्वतंत्र सिमेंट ग्राइंडिंग युनिट उभारण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या प्लांटपासून कल्याण-डोंबिवली परिसराची घनदाट नागरी वस्ती फक्त १० ते १२ किलोमीटर अंतरावर असून, येथे सुमारे २० लाखांहून अधिक लोकसंख्या राहते. त्यामुळे या सिमेंट प्लांटमुळे निर्माण होणाऱ्या सिमेंट धूळ, उत्सर्जन आणि प्रदूषणामुळे पर्यावरण, सजीव जीवन आणि स्थानिकांच्या आरोग्यावर दीर्घकालीन व गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकल्पासाठी पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन (ईआयए) सारांश प्रसिद्ध केला असून, त्यानुसार पब्लिक हियरिंग प्रक्रिया सुरू आहे, मात्र स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमी यांचा याला तीव्र विरोध असून, ते हरकत नोंदवत आहेत.

प्रस्तावित प्लांट अंबिवली, मोहने गावाजवळ २६.१३ हेक्टर जागेवर उभारला जाणार आहे. हा ड्राय सिमेंट ग्राइंडिंग प्रक्रियेवर आधारित आहे. कच्चा माल हाताळणी, उत्पादन आणि वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात सिमेंट धूळ आणि घातक वायू प्रदूषक उत्सर्जित होतील. या प्रदूषणामुळे केवळ कल्याण-डोंबिवली महानगरपालिका नाही, तर उल्हासनगर, म्हारळ-बुद्रुक परिसरातील सुमारे १४.८२ लाख लोकसंख्या प्रभावित होऊ शकते. प्लांटजवळ अनेक शाळा आणि रुग्णालये आहेत, जेथे आरोग्यावर थेट परिणाम होण्याची भीती आहे.

पर्यावरणावर होणारे परिणाम
हवा, पाणी, माती आणि जैवविविधतेवर विपरीत परिणाम होणार आहेत. बांधकाम आणि उत्खननामुळे धूळ वाढेल. कार्यान्वयन काळात सतत घातक प्रदूषक हवेत मिसळतील, जे ॲसिड रेन, जलवायू बदल आणि ओझोन परत यास कारणीभूत ठरू शकतात. सिमेंट धूळ मातीची सुपीकता कमी करेल, तसेच हेवी मेटल्स (क्रोमियम, निकेल, लीड) जमिनीत साचण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेती प्रभावित होईल. पाण्यातील प्रदूषणामुळे जलस्रोतांची गुणवत्ता खराब होण्याची शक्यता आहे, विशेषतः प्लांटजवळील उदंचन केंद्राकडे जिथे कल्याण-डोंबिवलीच्या नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो.
वनस्पतींवर धूळ साचल्यामुळे क्लोरोफिल प्रमाण कमी होऊन वनस्पतींचे नुकसान होईल. अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

स्थानिकांचा विरोध
कल्याण-डोंबिवलीसह आसपासच्या गावांतील लाखो लोकांच्या आरोग्यास आणि पर्यावरणाला धोका निर्माण करणाऱ्या या सिमेंट प्लांटला विरोध केला जात आहे. जागतिक सिमेंट उत्सर्जन तज्ज्ञांच्या अहवालानुसार सिमेंट प्लांट अनेक दुर्धर आजारांचे कारण ठरू शकतात.

कल्याण-डोंबिवली शहरासहित अनेक गावांतील लाखो लोकांच्या आरोग्याला आणि पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण करणारा सिमेंट प्रकल्प इथे नकोच. जागतिक सिमेंट उत्सर्जन तज्ज्ञांचे अहवाल सांगतात, सिमेंट प्लांट हे अनेक दुर्धर आजाराची जननी आहे. सर्वांनीच या प्लांटला विरोध करावा, आणि लोकांनी हरकती पाठवाव्यात.
-उदय रसाळ, माजी नगरसेवक (तक्रारदार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निघा इथून...! विराट कोहली, अनुष्का शर्माला न्यूझीलंडच्या हॉटेलमधून बाहेर काढलं; असं नेमकं काय घडलं?

Gariaband Encounter: सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; १० नक्षलवादी ठार, १ कोटींचं बक्षीस असणाऱ्या कमांडरचाही मृत्यू

Latest Marathi News Updates Live : वेरूळ घाटात टँकर पलटी होऊन दोन निष्पाप जीवांचा अंत

OBC Reservation: ''ओबीसींचं आरक्षणच संपलं..'', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत दिला जीव

Rahul Gandhi security issue : ‘’राहुल गांधींकडून नऊ महिन्यात सहा परदेश दौऱ्यात सुरक्षा प्रोटोकॉलचे उल्लंघन’’ ; 'CRPF’चं खर्गेंना पत्र!

SCROLL FOR NEXT